fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सतत पराभव पाहणाऱ्या आरसीबीच्या कर्णधार कोहलीने केले मोठे वक्तव्य

Virat kohli ipl 2020 royal challengers bangalore champion

September 8, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

विराट कोहलीची आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघ यावेळी पुर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. इतिहासाच कोणतंही दडपण हा संघ घेणार नाही.

या संघाचा स्टार कर्णधार विराट कोहली संघाबद्दल बोलताना म्हणाला, “2016 मध्ये संघात जशी ‘शांतता’ होती तशीच आता वाटत आहे.”

संघात नेहमीप्रमाणेच कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सारख्या चॅम्पियन खेळाडू आहेत. असे असले तरी मागील तीन हंगामात आरसीबीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. 2016 मध्ये संघाने अंतिम फेरी गाठली तेव्हा कोहलीने चार शतके ठोकली होती.

विराटला वाटतो आरसीबी संतुलीत संघ

तो आरसीबीच्या ‘बोल्ड डायरीज’ या यूट्यूब कार्यक्रमात म्हणाला, “2016 च्या आयपीएलचा भाग झाल्याचा आनंद झाला होता. तेव्हापासून हा सर्वात संतुलित संघ आहे. या सत्रात यश मिळू शकेल अशी अपेक्षा मला आणि डिव्हिलियर्स दोघांनाही आहे. या सत्रापूर्वी मला अशी शांतता कधीच वाटली नाही. डिव्हिलिअर्सलाही तेच वाटत आहे आणि तो अगदी वेळ घेत पूर्ण तंदरुस्त होऊन आला आहे. माझ्या मते आयपीएलच्या यावेळीच्या वातावरणाचा विचार करता मी अधिक चांगला आणि संतुलित आहे.”

भूतकाळातील गोष्टींबद्दल बोलताना विराट म्हणाला, “भूतकाळाच्या गोष्टी विसरून आम्ही कोणत्याही अपेक्षेच्या ओझाशिवाय खेळू. यापूर्वीही बर्‍याच वेळा असे केले आहे. आमच्याकडे खूप हुशार खेळाडू आहेत आणि लोकांना ते खेळताना पाहण्यास आवडतात. म्हणूनच संघाकडून बर्‍याच अपेक्षा आहेत.”

“व्यवस्थापन आणि खेळाडू यांच्यात पूल म्हणून काम करू शकणारे मुख्य प्रशिक्षक म्हणून माईक हेसन यांची नियुक्ती करणे योग्य निर्णय होता.” असेही त्याने प्रशिक्षकाबद्दल बोलताना सांगितले.

फिंच, मॉरिसने वाढवला विराटचा आत्मविश्वास

एक संघ म्हणून आयपीएलमध्ये यश मिळवून दिले नसले तरी संघ व्यवस्थापनाच्या आत्मविश्वासाच्या जोरावर कोहली क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकतो.
संघातील खेळाडूंबद्दल बोलताना विराट म्हणाला, “दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस, ऑस्ट्रेलियाचा वनडे कर्णधार अ‍ॅरोन फिंच आणि यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलिप यांनी संघात आत्मविश्वास वाढविला आहे. यंदा आयपीएलचा हंगाम दुबई, शारजाह आणि अबूधाबी येथे खेळला जाईल. सर्व ठिकाणांच्या आसपास राहून खेळाडूंना खेळणे सोपे होईल.”


Previous Post

केकेआरचा ‘तो’ नवा खेळाडू आहे केविन पीटरसनपेक्षाही खतरनाक, यावेळी करणार…

Next Post

मुंबईचा कर्णधार रोहितची २ वर्षाची मुलगी आहे खूपच हुशार, पहा व्हिडिओ

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

जबरदस्त! अवघ्या १४ धावा करुनही आझमची ट्वेंटी ट्वेंटीतील मोठ्या विक्रमाला गवसणी, ठरला पहिलाच

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

पराभवाचं दुख अन् त्यात शिक्षा! ‘या’ कारणामुळे एमएस धोनीला तब्बल १२ लाखांचा झाला दंड

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/@ChennaiIPL
IPL

DC च्या हातून CSK चारीमुंड्या चित, कॅप्टन धोनीने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL
IPL

‘या’ संघाविरुद्ध चेन्नई नेहमीच गंडते; पाहा चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करणारे संघ

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

फाफ डू प्लेसिसला शुन्यावर बाद करणारा आवेश खास चौथाच गोलंदाज, पाहा कोण आहेत अन्य तीन गोलंदाज

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

कहर! धोनी थोडेथोडके नाही तब्बल ६ वर्षे आणि १०८ डावानंतर झालाय शुन्यावर बाद, वाचा ही आकडेवारी

April 11, 2021
Next Post

मुंबईचा कर्णधार रोहितची २ वर्षाची मुलगी आहे खूपच हुशार, पहा व्हिडिओ

एक- दोन नाहीतर तब्बल ६ गोलंदाजांच्या ऍक्शनची बुमराहने केली नक्कल, व्हिडिओ होतोय व्हायरल

इंस्टाग्रामच्या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सची भरारी! अगदी सीएसकेही...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.