सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला तीन एकदिवसीय आणि तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. एकदिवसीय मालिकेत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना ढाका येथे खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्मा् बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना दुसऱ्या षटकात झेल घेण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे विराट कोहली याला सलामीसाठी यावे लागले. मात्र, तो काही खास करु शकला नाही आणि अवघ्या 5 धावा करत बाद झाला.
विराट कोहली (Virat Kohli) याला इबादत हसन (Ebadot Hossain) याने दुसऱ्या षटकात बाद केले. तो कमी धावसंख्येवर बाद झाल्याने त्याच्या एकदिवसीय फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकदिवसीय सामन्यांच्या मागील सात डावात चौथ्यांदा 10 पेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला. कोहली इबादत हसन याच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर पूल शॉट मारण्याच्या प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटच्या खालच्या बाजूला लागून स्टंप्सवर लागला आणि कोहली दुर्दैवीपणे बाद झाला. मागच्या 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने केवळ 73 धावा केल्या, ज्यात त्याची सरासरी फक्त 10.42 इतकी आहे.
विराट कोहली याची मागील सात सामन्यातील धावसंख्या-5,9,17,16,0,18,8
बांगलादेश विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहली अवघ्या 9 धावा करत बाद झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघाला एक गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. कोहलीली 2022मध्ये खेळलेल्या 10 डावात 189 धावा करता आल्या, जी त्याच्या कारकीर्दीतील तिसऱ्या क्रमांकाची निच्चांकी सरासरी आहे. मात्र, यंदाच्या टी20 विश्वचषकात विराटने धमाकेदार प्रदर्शन केले होते.
भारत आणि बांगलादेश या संघात ढाका येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळवला गेला. बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने नाणेफेक जिंकूण फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश संघाने निर्धारीत 50 षटकात 271 धावा केल्या. बांगलादेश संघासाठी मेहेदी हसन याने झंझावती शतक झळकावले.(Virat Kohli is getting trolled for his ODI performance)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दीपक हुड्डाने वाढवली टीम इंडियाची डोकेदुखी! रोहितनंतर संघातील दुसरा खेळाडू दुखापतग्रस्त
‘नाही बनायचं ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार’, वॉर्नरसाठी क्रिकेटपेक्षा कुटुंब महत्वाचे