यंदाचा उर्वरित आयपीएल (Indian Premier League 2025) हंगाम आजपासून (17 मे) सुरू होणार आहे. यादरम्यान पहिला सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) संघात खेळला जाईल. या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) इतिहास रचण्याची संधी असेल. विराट आपल्या नावावर एक मोठा रेकाॅर्ड करू शकतो. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांचा रेकाॅर्ड मोडण्याची त्याला उत्तम संधी आहे.
विराट कोहली 2008 पासून आयपीएलमध्ये आरसीबी फ्रँचायझीचा भाग आहे. विराटची बॅट आतापर्यंत सर्व संघांविरुद्ध जोरदार बोलली आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील आहे. परंतु (17 मे) रोजी विराट आपल्या नावावर एक मोठी कामगिरी करू शकतो. त्याला आयपीएलमध्ये केकेआरविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याची संधी आहे.
सध्या, केकेआर विरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. त्याने 1,093 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 1,083 धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत केकेआर विरुद्ध 1,021 धावा केल्या आहेत. म्हणजेच, जर विराट कोहलीने केकेआर विरुद्धच्या सामन्यात 73 धावा केल्या तर तो डेव्हिड वॉर्नर आणि रोहित शर्माला मागे टाकू शकतो.
केकेआर विरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
डेव्हिड वॉर्नर – 1,093 धावा
रोहित शर्मा – 1,083 धावा
विराट कोहली – 1,021 धावा
शिखर धवन – 907 धावा
आयपीएल 2025 मध्ये विराट कोहली (Virat Kohli) उत्तम फॉर्ममध्ये आहे. तो जवळजवळ सर्वच सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी करत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये विराटने 63.13 च्या सरासरीने 505 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 7 अर्धशतकेही झळकावली आहेत. आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.






