---Advertisement---

एकमेवाद्वितीय विराट! टी२० क्रमवारीत पाचव्या स्थानी येताच ‘हा’ कारनमा करणारा ठरला एकमेव फलंदाज

On: बुधवार, मार्च 17, 2021 10:31 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड विरुद्ध पिच सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. तीन सामन्यानंतर भारतीय संघ २-१ अशा पिछाडीवर आहे. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा चांगलाच फॉर्ममध्ये आलेला दिसतोय. सलग दोन सामन्यात नाबाद अर्धशतके काढून त्याने फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत पाचवे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर त्याने एका अनोख्या विक्रमाला देखील गवसणी घातली.

आयसीसीने जाहीर केली टी२० क्रमवारी
आयसीसीने भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यानंतर खेळाडूंची नवी क्रमवारी जाहीर केली. फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत एका स्थानाच्या सुधारणांसह कर्णधार विराट कोहली अव्वल पाच मध्ये दाखल झाला.

त्याचबरोबर विराटने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल पाच फलंदाजांत सामील असणारा एकमेव फलंदाज होण्याचा मान मिळवला. विराट कसोटी क्रमवारीत पाचव्याच तर, वनडे क्रमवारीत पहिल्यास्थानी विराजमान आहे.

जबरदस्त फॉर्ममध्ये आहे विराट
इंग्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट खातेही खोलू शकला नव्हता. मात्र, दुसऱ्या सामन्यात नाबाद ७३ धावांची ‘मॅचविनिंग’ खेळी करून त्याने संघाला विजय मिळवून दिला. तिसऱ्या सामन्यातही संघ अडचणीत असताना, त्याने नाबाद ७७ धावांची खेळी करून भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली होती.

आयसीसीने जाहीर केली फलंदाजांची नवी क्रमवारी
आज (१७ मार्च) आयसीसीने फलंदाजांच्या टी२० व वनडे क्रमवारीची घोषणा केली. टी२० क्रमवारीत इंग्लंडचा डेव्हिड मलान व ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सातत्याने अपयशी ठरत असलेल्या केएल राहुलला या क्रमवारीत नुकसान झाले व तो चौथ्या क्रमांकावर घसरला. त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या स्थानी आला.

दुसरीकडे, वनडे क्रमवारीत भारताचे विराट कोहली रोहित शर्मा हे पहिल्या दोन तर बाबर आझम, रॉस टेलर व ऍरॉन फिंच अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

चौथ्या टी२० सामन्यात ‘हे’ तीन भारतीय खेळाडू बसणार बाकावर? पाहा कोणाला मिळू शकते संधी

मैदानावर पुन्हा घोंगावलं ‘युवी’ नावाचं वादळ! सिक्सर किंगने एकाच षटकात लगावले ४ षटकार; पाहा व्हिडिओ

भारतीय महिला संघाच्या पदरी पुन्हा निराशा, दक्षिण आफ्रिका महिलांचा शानदार मालिकाविजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---