---Advertisement---

टी20 विश्वचषकाच्या इतिहासात कोहलीच्या नावावर ‘विराट’ विक्रम, ठरलाय एकमेव खेळाडू

Virat Kohli
---Advertisement---

क्रिडाविश्वात अनेकवेळा सामने खेळताना अनेक विक्रम रचले जातात तर काही मोडले जातात, मात्र काही विक्रम मोडणे अशक्य असतात. 16 ऑक्टोबरपासून पुरूष क्रिकेट संघाचा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup) खेळला जाणार आहे. याचे यजमानपद गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला देण्यात आले आहे. यामुळे या स्पर्धेतही काही नवे विक्रम रचले जातील तर काही जुने विक्रम तोडले जातील. याला एक अपवाद आहे तो म्हणजे टी20 विश्वचषकाच्या इतिहासात हा विक्रम एका भारतीय खेळाडूने केला आहे, जो आतापर्यंत कोणीही मोडू शकला नाही.

भारताचा अनुभवी आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने टी20 विश्वचषकामध्ये नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. तो यावर्षी त्याच्या कारकिर्दीतील पाचवा टी20 विश्वचषक खेळणार आहे. त्याने टी20 विश्वचषकाच्या इतिहासात अनेक विक्रम रचले आहेत. यामध्ये त्याचा एक विक्रम जो आतापर्यंत कोणत्याच खेळाडूने मोडला नाही. विराटने 2014 आणि 2016च्या टी20 विश्वचषकांमध्ये उत्तम कामगिरी करताना मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. तो टी20 विश्वचषकामध्ये सलग ते पण दोन मालिकावीराचा पुरस्कार जिंकणारा एकमेव खेळाडू आहे.

विराटने 2014च्या हंगामात 319 धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिले स्थान काबीज केले होते, तर 2016मध्ये 273 धावा करत दुसरे स्थान मिळवले होते. मात्र या दोन्हीमध्ये भारत विश्वविजेता बनू शकला नाही. 2014च्या अंतिम सामन्यात भारताला श्रीलंकेने पराभूत केले होते. 2016मध्ये भारत उपांत्य फेरीत पराभूत होत बाहेर झाला होता. विराटने आतापर्यंत टी20 विश्वचषकात 21 सामने खेळताना 76.81च्या सरासरीने 845 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाने मागील टी20 विश्वचषक जिंकला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नर (David Warner) याने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. आता ऑस्ट्रेलियाकडेच यजमानपद आहे आणि वॉर्नरचा ऑस्ट्रेलियाच्या मुख्य संघात समावेश आहे. यामुळे त्याच्याकडे विराटचा हा विक्रम मोडण्याची संधी आहे.

पुरूष टी20 विश्वचषकाचे मालिकावीर-
2007 – शाहीद आफ्रिदी
2009 – तिलकरत्ने दिलशान
2010 – केविन पीटरसन
2012  – शेन वॉटसन
2014 – विराट कोहली
2016 – विराट कोहली
2021 – डेविड वॉर्नर

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टी20 विश्वचषकात बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची वर्णी, बीसीसीआयने दिली माहिती
बाबो! भारत अन् पाकिस्ताननंतर आता ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड बनला चाहत्यांचा आवडता सामना, सर्व तिकिटांची विक्री
‘हुड्डा आ जाएगा मैं चला…’, हे काय बोलून गेला विराट? व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---