दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात केपटाऊन येथे कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना (Third Test) सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ७७.३ षटकांमध्ये २२३ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या दिवशी ३ बाद १०० धावा अशा स्थितीत खेळत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताच्या खेळाडूंनी निराशा केली.
पण कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे एकाकी झुंज दिली. त्याच्या या खेळीचे क्रिकेटविश्वातून भरपूर कौतुक होताना दिसत आहे. आता भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यानेही विराटचे कौतुक केले आहे. विराटने त्याचा अहंकार बाजूला ठेवला, यामुळेच तो इतकी शानदार खेळी करू शकला आहे, असे गंभीरने म्हटले आहे. (Virat Kept His Ego Aside)
व्हिडिओ पाहा-
एका कार्यक्रमात बोलताना गंभीर म्हणाला की, “विराट स्वत:च कित्येकदा म्हणाला आहे की, जर तुम्हाला इंग्लंडमध्ये धावा करायच्या असतील, तर तुम्हाला तुमचा अहंकार बाजूला ठेवावा लागतो. आज विराटने दक्षिण आफ्रिकेतही असेच केले आहे. त्याने मैदानावर फलंदाजीला उतरण्यापूर्वीच त्याचा अहंकार किटबॅगमध्ये बंद केला होता. याच कारणास्तव विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इतकी शानदार खेळी खेळू शकला आहे.”
“त्याने आपल्या खेळीदरम्यान बाहेरून येणाऱ्या चेंडूला छेडले नाही. तो नक्कीच बीट झाला पण त्याने आपला अहंकार बाजूला ठेवला आणि प्रत्येक चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला नाही आणि तो त्वरित गोलंदाजांच्या जाळ्यात फसला नाही”, असेही गंभीरने पुढे म्हटले.
हेही वाचा- विराटला नाबाद घोषित केल्यानंतर भारत-दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार आले आमने सामने, पाहा व्हिडिओ
विराटने खेळली २ वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळी
विराटने केपटाऊन कसोटीच्या पहिल्याच दिवशी मागील २ वर्षांतील सर्वोत्तम खेळी खेळली. केएल राहुल आणि मयंक अगरवाल ही भारताची सलामी जोडी स्वस्तात पव्हेलियनला परतल्यानंतर विराटने चेतेश्वर पुजारासोबत मिळून एकाकी झुंज दिली. पुढे संघाची धावसंख्या ९५ असताना वैयक्तिक ४३ धावांवर पुजारा बाद झाला. त्यानंतर भारताच्या एकाही फलंदाजाचा दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांपुढे टिकाव लागला नाही.
मात्र विराटने एक बाजून धरून चिवट खेळी केली. त्याने २०१ चेंडूंचा सामना करताना ७९ धावा चोपल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १२ चौकारांसह १ खणखणीत षटकारही निघाला. त्याच्या या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला २२४ धावांचे आव्हान देऊ शकला.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑफ टू SA..! वनडे मालिकेसाठी धवनसह ‘हे’ भारतीय शिलेदार दक्षिण आफ्रिकेला रवाना, बघा फोटो
अंडर-१९ विश्वचषकात भारताची विजयी घोडदौड सुरूच, दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्सने विजय
हेही पाहा-