---Advertisement---

गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर विराट कोहली, ऋषभ पंत भडकले, म्हणाले. . .

---Advertisement---

मुंबई । उत्तर केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यामध्ये एका गर्भवती हत्तीणीला क्रूरपणे मारल्याची हद्रयदावक घटना घडली. काही समाजकंटकांनी अननसमध्ये फटाके भरून तिला खायला दिले. त्यानंतर त्या हत्तीणीचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेमुळे वन्यप्रेमींसह नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत ही क्रूर घटना पाहून अस्वस्थ झाले आहेत. 

विराट कोहलीने ट्विट करून म्हणाला की, “ही घटना ऐकून मी चांगलाच अस्वस्थ झालो. चला प्राण्यांशी प्रेमाने वागूयात. अशा घटना बंद झाल्या पाहिजेत.”

भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत म्हणाला की,  “केरळमधील गर्भवती हत्तीणीची घटना वाचून मला फार वाईट वाटले. मला खूपच राग आला. दोषींवर कडक कारवाई व्हावी. लोक किती क्रूर असतात.”

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 25 मे रोजी एक गर्भवती हत्तीण अन्नाच्या शोधात जंगलांमधून गावात आली. काही लोकांनी तिला अननस मध्ये फटाके घालून खायला दिले. ते अन्न खाताच तिच्या तोंडात स्फोट झाला. त्यामुळे तिचा जबडा फाटला. दात तुटून पडले. ती गंभीर जखमी झाली. तोंडातल्या वेदना कमी करण्यासाठी एका नदीमध्ये जाऊन उभा राहिली. लोकांनी तिला नदीतून बाहेर काढून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ती बाहेर आली नाही. नदीतच तीन दिवस उभी राहिली. अखेर गंभीर जखमांमुळे तिचा मृत्यू झाला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---