Monday, May 23, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराटचा उत्साह शिगेला! केएल राहुल आऊट होताच दिली अशी रिऍक्शन, पाहा Video

विराटचा उत्साह शिगेला! केएल राहुल आऊट होताच दिली अशी रिऍक्शन, पाहा Video

April 20, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli

Photo Courtesy: Twitter


क्रिकेट मैदानावर विराट कोहली हा बऱ्याचदा आक्रमक असतो. मैदानात त्याची उर्जा नेहमीच दिसून येते. नुकत्याच मंगळवारी (१९ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ३१ व्या सामन्यातही त्याची अशीच उर्जा दिसून आली. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळवला गेला. डॉ. डी वाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात बेंगलोरने १८ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, बेंगलोरकडून खेळणारा विराट मैदानावर उर्जा आणताना दिसला.

झाले असे की, बेंगलोरने लखनऊसमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी क्विंटन डी कॉक आणि कर्णधार केएल राहुल (KL Rahul) यांची जोडी मैदानात उतरली. यावेळी डी कॉक केवळ ३ धावा करून बाद झाला, तर त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला मनिष पांडे देखील ६ धावा करून माघारी परतला.

यानंतर केएल राहुलने कृणाल पंड्याबरोबर डाव सावरताना दिसला. मात्र, ८ व्या षटकात बेंगलोरकडून हर्षल पटेलने लेग साईडला चेंडू टाकला, ज्यावर केएल राहुलने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो चूकला आणि चेंडू यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या हातात गेला. ज्यावर बेंगलोरच्या खेळाडूंनी बादसाठी अपील केले. पण पंचांनी ते फेटाळले.

त्यामुळे बेंगलोर संघाने डीआरएस रिव्ह्यूची (DRS Review) मागणी केली, ज्यात केएल राहुलच्या गल्व्हजला चेंडू लागला आहे. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी केएल राहुलला बाद दिले. त्याला बाद देताच विराट कोहली (Virat Kohli) भलताच खुश दिसला आणि तो मोठ्याने ओरडून सेलिब्रेशन करताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. केएल राहुल ३० धावा करून बाद झाला.

pic.twitter.com/yGXdNOd6Wg

— Diving Slip (@SlipDiving) April 19, 2022

केएल राहुल बाद झाल्यानंतर कृणाल पंड्याने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला, पण तोही ४२ धावा करून बाद झाला. नंतरही लखनऊच्या खेळाडूंना फार काही करता आले नाही. त्यामुळे लखनऊला २० षटकांत ८ बाद १६३ धावाच करता आल्या, परिणामी संघाला १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. बेंगलोरकडून जोस हेजलवूडने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या (Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants).

तत्पूर्वी लखनऊने नाणेफेक जिंकून बेंगलोरला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. बेंगलोरकडून फाफ डू प्लेसिसने ९६ धावांची खेळी केली. त्यामुळे बेंगलोरने २० षटकांत ६ बाद १८१ धावा केल्या आणि लखनऊसमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले होते. लखनऊकडून दुश्मंता चमिरा आणि जेसन होल्डरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

बिग ब्रेकिंग! दिल्लीचा आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, आज होणाऱ्या दिल्ली-पंजाब सामन्यावर प्रश्नचिन्ह

‘विराटने आता विश्रांती घ्यावी’, केवळ रवी शास्त्रीच नाही, तर ‘या’ दिग्गजाचाही सल्ला

विकेट गमावताच स्टॉयनिसची शिवीगाळ स्टंपमाईकमध्ये कैद, पाहा हेजलवुडच्या षटकात काय घडले


ADVERTISEMENT
Next Post
DC-vs-PBKS

DC vs PBKS | नाणेफेक जिंकत रिषभ पंतचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय, दिल्लीचा महत्त्वाचा खेळाडू संघातून बाहेर

Praveen-Kumar

आयपीएलमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर फेकणाऱ्या तगड्या गोलंदाजाचे वक्तव्य; म्हणाला, 'अजूनही फासे फिरवायला बराच वाव'

Avesh-Khan-And-Umran-Malik

आयपीएल २०२२च्या खाणीतून टीम इंडियाला मिळाले 'हे' ३ हिरे; आगामी टी-२० विश्वचषकात मिळवू शकतात स्थान

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.