इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (४ ऑगस्ट) कसोटी मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर होत आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात नाणेफेक गमावताच भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला.
विराटच्या नावे नकोसा विक्रम
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर तब्बल दिड महिन्याच्या कालावधीनंतर भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. विराट सलग दुसऱ्यांदा इंग्लंड दौऱ्यावर भारताचे नेतृत्व करत आहे.
या सामन्यात यजमान इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, नाणेफेक गमावताच भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावे एक नकोसा विक्रम बनला. विराट आता सर्वाधिक वेळा कसोटीमध्ये नाणेफेक गमावणारा भारतीय कर्णधार बनला आहे.
त्याने ६२ सामन्यात ३५ वेळा नाणेफेक गमावली. यापूर्वी माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने ६० कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना ३४ वेळा नाणेफेक गमावली होती. यासोबतच विराटने इंग्लंडच्या भूमीवर सहाव्या सामन्यात भारताचे नेतृत्व करताना सर्व सहा सामन्यात नाणेफेक देखील गमावली आहे.
पहिल्या सामन्यात भारताची उत्कृष्ट सुरुवात
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने या पहिल्या सामन्यात उत्कृष्ट सुरुवात केली. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्सला पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर पायचीत करून भारताला पहिले यश मिळवून दिले.
या सामन्यात भारतीय संघाने अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यांना विश्रांती देत शार्दुल ठाकूर व मोहम्मद सिराज यांना संघात स्थान दिले. सरावादरम्यान जखमी झालेल्या मयंक अगरवाल याच्या जागी केएल राहुलला संधी मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या –
“मला खात्री आहे, विराट भैय्या भारताला इंग्लंडमध्ये मालिका जिंकून देईल”
वाईट झालं राव! सुवर्ण पदकाचं स्वप्न तर भंगलं; आता कांस्य पदकासाठी दीपक पुनिया करणार दोन हात
उत्तुंग भरारी! रवी दहियाने अंतिम सामन्यात प्रवेश करत रचला इतिहास; बनला केवल दुसरा भारतीय कुस्तीपटू