‘माणूस जसा दिसतो तसा नसतो’ असे आपण अनेकांकडून ऐकले असेल. मात्र, काही भारतीय क्रिकेटमधील खेळाडूंच्या बाबतीतही असेच आहे. भारताचे काही खेळाडू मैदानावर एकदम आक्रमक असतात, तर मैदानाबाहेर त्यांचे वेगळे रूप पाहायला मिळते. ते जेवढे आक्रमक असतात, तेवढेच प्रेमळ आणि दयाळूदेखील असतात. असेच काहीसे विराट कोहली याच्या बाबतही आहे. याचा प्रत्यय विराटने आयपीएलदरम्यान केलेल्या एका गोष्टीवरून येतो.
प्रसिद्ध क्रीडा पत्रकार सुनंदन लेले (Sunandan Lele) यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत लेले यांनी विराट कोहली (Virat Kohli) याच्या दयाळूपणाबाबत भाष्य केले. त्याच्याबाबत या गोष्टी ऐकल्यानंतर प्रत्येक चाहत्याच्या मनात विराटविषयीचे प्रेम आणखी वाढले आहे.
काय म्हणाले सुनंदन लेले?
मुलाखतीदरम्यान विराटविषयी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाबद्दल बोलताना लेले म्हणाले की, “तुम्ही ज्या विराटबद्दल बोलताय की, जो लगेच कुणालाही भेटत नाही, तो विराट 52 वयस्कर आजी-आजोबांशी वैयक्तिकरीत्या भेटलाय. ‘तुम्ही ठीक आहात का? काय झालंय तुम्हाला?’ अशी विचारपूसही त्याने केली. एक नाही, तर त्याने प्रत्येक 52 आजी-आजोबांच्या खोलीत जाऊन, त्याच्या बाजूला बसून त्यांच्याशी दीड तास त्याने संवाद साधला.”

पुढे बोलताना ते म्हणाले की, “त्यावेळी मी आनंदाने रडत होतो की, हा काय व्यक्ती आहे. किती प्रेमाने तो सर्वांशी भेटला. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि विराटच्या डोळ्यात दु:खाचे अश्रू होते.”
याच आधारावरून जॉन्स नावाच्या एका ट्विटर युजरने ट्वीटही केले. त्याने असे लिहिले आहे की, “आयपीएलच्या एका हंगामादरम्यान विराट कोहली पुण्यातील 52 वयस्कर आजी-आजोबांना भेटला होता. त्याने आणि त्याच्या फाऊंडेशनने वृद्धाश्रमाला दोन वर्षे पैशांची मदत करण्याचे ठरवले होते.”
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1627876533934358530
विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावा पूर्ण
विराट कोहली सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग आहे. सध्या 4 सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने खेळून झाले आहेत. यादरम्यान विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम करून दाखवला आहे. सचिन तेंडुलकर याच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसराच भारतीय आहे.
याव्यतिरिक्त कसोटी मालिकेतील तिसरा सामना 1 ते 5 मार्चदरम्यान खेळला जाणार आहे, तर चौथा सामना 9 ते 13 मार्चदरम्यान पार पडणार आहे. यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिकाही खेळली जाणार आहे. या मालिकेत विराट भारतीय संघाचा भाग आहे. (Virat Kohli met 52 senior citizens in an old age home in Pune During An IPL Season- Sunandan Lele)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बोंबला! उपकर्णधारपद तर गेलंच, आता कर्णधारपदही जाणार? आयपीएलमध्ये ‘हे’ 2 खेळाडू घेऊ शकतात राहुलची जागा
धोनीच्या ऐतिहासिक आयपीएल करिअरला ‘या’ दिवशी लागणार ब्रेक? ‘थाला’प्रेमीने बातमी वाचलीच पाहिजे





