Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोंबला! उपकर्णधारपद तर गेलंच, आता कर्णधारपदही जाणार? आयपीएलमध्ये ‘हे’ 2 खेळाडू घेऊ शकतात राहुलची जागा

बोंबला! उपकर्णधारपद तर गेलंच, आता कर्णधारपदही जाणार? आयपीएलमध्ये 'हे' 2 खेळाडू घेऊ शकतात राहुलची जागा

February 21, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
KL-Rahul

Photo Courtesy: iplt20.com


भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज समजला जाणारा केएल राहुल मागील काही सामन्यांपासून सपशेल फ्लॉप ठरताना दिसत आहे. त्याने मागील 9 कसोटी डावांमध्ये एकदाही मोठी धावसंख्या उभारली नाही. यादरम्यानची त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही फक्त 23 इतकी होती. अशी खराब कामगिरी करूनही दिल्ली कसोटीत कर्णधार रोहित शर्मा याने त्याला दिल्ली कसोटीत त्याच्यावर विश्वास दाखवला आणि स्पष्ट केले की, संघ व्यवस्थापन त्याच्या सोबत आहे. मात्र, त्याच सायंकाळी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटींसाठी संघाची घोषणा झाली, तेव्हा त्यात कोणताही बदल नव्हता. असे असले, तरीही संघाचे उपकर्णधारपद कुणाकडेच नव्हते. पहिल्या दोन कसोटीत ही जबाबदारी राहुलकडे होती.

केएल राहुल (KL Rahul) याने 2 महिन्यापूर्वी कसोटीत भारताचे नेतृत्व केले होते. मात्र, आता त्याची कारकीर्द धोक्यात आहे. आधी वनडेचे आणि आता कसोटीचे उपकर्णधारपदही गेले. अशात प्रश्न उपस्थित होतो की, बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेवरही पडू शकतो.

खरं तर, राहुलने मागील वर्षी आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचे नेतृत्व केले होते. राहुलच्या नेतृत्वात लखनऊ संघाने पात्रता फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. यामध्ये राहुलचे मोलाचे योगदान होते. त्याने आयपीएल 2022मध्ये 15 सामन्यात 51च्या सरासरीने 616 धावा चोपल्या होत्या. त्याने यादरम्यान दोन शतकेही झळकावली होती.

चार वर्षांत घसरली राहुलची कसोटी सरासरी
आयपीएल 2022नंतर केएल राहुल याच्या कामगिरीचा आलेख सातत्याने घसरताना दिसत आहे. त्याने आयपीएल 2022नंतर एकूण 16 टी20 सामने खेळले. त्यात त्याने 6 अर्धशतके केली आहेत. मात्र, यामधील अर्धे अफगाणिस्तान, बांगलादेश यांसारख्या संघांविरुद्ध केले आहेत. कसोटीत राहुलची सरासरी 33 आहे. मात्र, 2018च्या सुरुवातीनंतर ही सरासरी घसरून 26वर आली आहे. या काळात राहुलने 48 डावात 6 वेळा 50हून अधिक धावा चोपल्या. म्हणजेच, आकड्यांवरून असे दिसते की, राहुल संघर्ष करतोय. त्यामुळे त्याला वनडे आणि कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढण्यात आले.

राहुलच्या नेतृत्वात लखनऊने खेळलेला आयपीएलचा प्लेऑफ सामना
आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व करण्याबाबत बोलायचं झालं, तर ते राहुलने एकाच हंगामात चांगली कामगिरी केली आहे. अशात आयपीएल 2023साठी लखनऊ संघ व्यवस्थापन कर्णधार बदलणार असल्याची कोणतीही चिन्हे नाहीत. मात्र, ज्याप्रकारे भारतीय संघात राहुलची स्थिती बदलली आहे, ते पाहता, लखनऊमध्येही जर हा बदल झाला, तर आश्चर्य वाटणार नाही.

क्विंटन डी कॉक सांभाळू शकतो कर्णधारपद
लखनऊ संघात असे दोन खेळाडू आहे, जे राहुलच्या जागी नेतृत्व करू शकतात. त्यात एक म्हणजे क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) आणि दुसरा म्हणजे मार्कस स्टॉयनिस होय. डी कॉकने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले आहे. तसेच, तो दीर्घ काळापासून आयपीएलचा भाग आहे. तसेच, स्टॉयनिसनेही 200हून अधिक टी20 सामने खेळले आहेत. त्याची गणना शानदार अष्टपैलू खेळाडूंमध्ये होते. बिग बॅश लीगमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्याने 2023मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट पुरस्कारादरम्यान वर्षाचा सर्वोत्तम टी20 खेळाडूचा पुरस्कारही पटकावला होता. त्यामुळे तो कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळू शकतो.

आयपीएल 2023ची सुरुवात 31 मार्चपासून गतविजेत्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघातील सामन्याने होणार आहे. (cricketer kl rahul lost vice captaincy of team india in test odi may loose responsibility to quinton de cock ipl 2023 know here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या ऐतिहासिक आयपीएल करिअरला ‘या’ दिवशी लागणार ब्रेक? ‘थाला’प्रेमीने बातमी वाचलीच पाहिजे
शाब्बास पोरींनो! आयर्लंडला धूळ चारत सलग दुसऱ्यांदा टीम इंडिया टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत


Next Post
Virat-Kohli-IPL

दिलदार विराट! एका नाही, तर वृद्धाश्रमातील 52 आजी-आजोबांना भेटून रडलेला कोहली; वाचून तुम्हीही व्हाल भावूक

Rahul-Dravid-And-KL-Rahul

'मी त्याला प्रशिक्षण देत नाही...', राहुलच्या फ्लॉप कामगिरीवर कोच द्रविडची सर्वात मोठी प्रतिक्रिया

Orla-Prendergast

Video: सामना गमावला, पण आयर्लंड महिलांनी फिल्डिंगने जिंकली मने; हरमन 13, तर ऋचा शून्यावर बाद

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143