Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धोनीच्या ऐतिहासिक आयपीएल करिअरला ‘या’ दिवशी लागणार ब्रेक? ‘थाला’प्रेमीने बातमी वाचलीच पाहिजे

धोनीच्या ऐतिहासिक आयपीएल करिअरला 'या' दिवशी लागणार ब्रेक? 'थाला'प्रेमीने बातमी वाचलीच पाहिजे

February 21, 2023
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
MS-Dhoni

Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL


जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये एमएस धोनी या दिग्गजाचाही समावेश होतो. धोनी आगामी आयपीएल 2023 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. त्याने त्याच्या शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2019साली खेळला होता. तसेच, त्यानंतर ऑगस्ट 2020मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांतून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून अजूनही खेळतच आहे. 41 वर्षीय धोनीला अनेकदा त्याच्या निवृत्तीविषयी विचारणा केली आहे. मात्र, त्याने कधीच याबाबत वाच्यता केली नाही आणि प्रश्न टाळला. अशात आता त्याच्याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

धोनीच्या निवृत्तीविषयी मोठी अपडेट
एमएस धोनी याच्या आयपीएल निवृत्तीविषयी (MS Dhoni IPL Retirement) मोठी अपडेट समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आयपीएल 2023मध्ये धोनी खेळाडू म्हणून शेवटचा मैदानात उतरू शकतो. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने प्लेऑफमध्ये एन्ट्री केली नाही, तर 14 मे (MS Dhoni Last Match 14 May) रोजी धोनी त्याचा शेवटचा सामना खेळू शकतो. या दिवशी चेपॉक म्हणजेच चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडिअममध्ये सीएसकेचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे.

‘एमएस धोनीचा शेवटचा हंगाम असेल, तर…’
चेन्नईच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “होय, एक खेळाडू म्हणून हा धोनीचा शेवटचा हंगाम असेल. आतापर्यंत आपल्याला हेच माहिती आहे. मात्र, हा त्याचा निर्णय आहे. त्याने अधिकृतरीत्या याबाबत वक्तव्य केले नाहीये की, तो कधी निवृत्ती घेणार आहे. सीएसकेच्या सर्व चाहत्यांसाठी हा खास क्षण असणार आहे, कारण आयपीएलचे पुनरागमन चेन्नईत होत आहे. मात्र, जर धोनी त्याचा शेवटचा हंगाम खेळत असेल, तर हा एक दु:खद क्षण असेल.”

चार वर्षानंतर चेन्नईत होणार सामना
तब्बल चार वर्षांनंतर चेन्नई सुपर किंग्स संघ त्यांच्या एम. ए. चिदंबरम (M. A. Chidambaram) या घरच्या मैदानावर उतरेल. 2019मध्ये चेन्नईने या मैदानावर शेवटचा सामना खेळला होता. कोरोनामुळे मागील तिन्ही हंगामात चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर एकही सामना खेळता आला नव्हता. आता धोनी घरच्या मैदानावर आपल्या चाहत्यांपुढे उतरणार आहे. 2008मध्ये धोनीची नाळ चेन्नई सुपर किंग्स संघाशी जोडली गेली होती. मधले दोन वर्षे संघावर बंदी आणली गेली होती, त्यादरम्यान धोनी दुसऱ्या संघाकडून खेळला होता. याव्यतिरिक्त धोनी नेहमी चेन्नई संघासोबतच खेळला आहे. आता चाहत्यांना पुन्हा एकदा मैदानावर धोनीला खेळताना पाहता येणार आहे. (thala ms dhoni may play his farewell match on 14 may csk chepauk stadium csk)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शाब्बास पोरींनो! आयर्लंडला धूळ चारत सलग दुसऱ्यांदा टीम इंडिया टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत
विराट-रोहितनंतर हरमनच! टी20 कारकिर्दीत पार केला नवा मैलाचा दगड


Next Post
KL-Rahul

बोंबला! उपकर्णधारपद तर गेलंच, आता कर्णधारपदही जाणार? आयपीएलमध्ये 'हे' 2 खेळाडू घेऊ शकतात राहुलची जागा

Virat-Kohli-IPL

दिलदार विराट! एका नाही, तर वृद्धाश्रमातील 52 आजी-आजोबांना भेटून रडलेला कोहली; वाचून तुम्हीही व्हाल भावूक

Rahul-Dravid-And-KL-Rahul

'मी त्याला प्रशिक्षण देत नाही...', राहुलच्या फ्लॉप कामगिरीवर कोच द्रविडची सर्वात मोठी प्रतिक्रिया

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143