---Advertisement---

ना शतक ना प्रभाव! २०२१ मध्ये विराट ‘सुपरफ्लॉप’

virat-sa
---Advertisement---

जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणजे भारतीय संघाचा दिग्गज व कर्णधार विराट कोहली (virat kohli). परंतु विराट मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. २०२१ वर्ष त्याच्यासाठी खूपच निराशाजनक राहिले. या संपूर्ण वर्षात त्याच्या बॅटमधून एकही शतकी खेळी येऊ शकली नाही. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात विराटने जर त्याने शतक केले असते, तर चाहत्यांना त्याचे शतक पाहण्यासाठी पुढच्या वर्षात जाण्याची गरज नव्हती. मात्र, दुर्दैवाने तसे झाले नाही.

भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिविरुद्धचा पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरला सुरू झाला. विराटचे दक्षिण आफ्रिकेतील यापूर्वीचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. अशात विराटकडून या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, सामन्यच्या दोन्ही डावांमध्ये तो अपयशी ठरला. त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात ३५, तर दुसऱ्या डावात १८ धावांची खेळी केली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात विराट चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. मात्र, स्टंपच्या बाहेर चाललेल्या चेंडूला मारण्याच्या नादात त्याने विकेट गमावली. सामन्याच्या दुसऱ्या डावात देखील तो अशाच प्रकारे बाद झाला. चौथ्या दिवशी विराट अशाच एका स्टंपच्या बाहेरच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूवर कव्हर ड्राईव्ह खेळण्याच्या नादात झेलबाद झाला.

विराटने त्याचे शेवटचे शतक २०१९ मध्ये केले होते. त्यानंतर बराच काळ उलटून गेला आहे. यादरम्यान तो एकही शतक करू शकला नाही. उभय संघातील दुसरा कसोटी सामना आता पुढच्या वर्षी म्हणजेच तीन जानेवारीपासून खेळला जाणार आहे. अशात २०२१ मध्ये विराटचे शतक पाहण्याचे चाहत्याचे स्वप्न भंगले आहे.

दरम्यान, विराटच्या २०२१ मधी प्रदर्शनचा विचार केला, तर ते खूपच खराब आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधीत मिळून तो यावर्षी एक हजार धावा देखील करू शकला नाही. एकदिवसीय, टी२० आणि कसोटी सामन्यांचा एकत्रित विचार केला, तर विराटने यावर्षी ३७.७ च्या सरासरीने ९६४ धावा केल्या आहेत. जर फक्त कसोटी क्रिकेटचा विचार केला, तर त्याने यावर्षी ११ कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये ५३६ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी २८.२१ होती.

महत्वाच्या बातम्या –

टीम इंडियासाठी ‘पुढील वरीस मोक्याच’! टी२० विश्वचषकासह खेळणार ‘या’ महत्वाच्या मालिका

नव्या आयसीसी क्रमवारीत अश्विनने उंचावला टीम इंडियाचा झेंडा; रोहित-विराट ‘या’ क्रमांकावर

दिग्गजाने सांगितले इंग्लंडच्या लाजिरवाण्या पराभवाचे खरे कारण; म्हणाला…

व्हिडिओ पाहा –

हे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय शतक | Indian Bowlers Who Made Test Century

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---