नेपीयर। भारतीय संघाने आज(23 जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवत न्यूझीलंड दौऱ्याची यशस्वी सुरुवात केली आहे.
या सामन्यात भारतासमोर प्रखर सुर्यप्रकाशामुळे डकवर्थ लूईस नियमानुसार 49 षटकात 156 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात केली. या दोघांनी 41 धावांची भागीदारी रचली होती मात्र रोहितला डो ब्रासवेलने बाद करत भारताला पहिला धक्का दिला.
त्यामुळे कर्णधार विराट कोहलीला फलंदाजीसाठी यावे लागले. विराट आणि शिखरने चांगली फलंदाजी करताना दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजयाच्या समीप पोहचवले. पण ही जोडी तोडण्यात लॉकी फर्ग्यूसनला यश आले. त्याने विराटला 45 धावांवर असताना बाद केले.
त्यामुळे विराटची अर्धशतकी खेळी करण्याची संधी केवळ 5 धावांनी हुकली. जर विराटने हे अर्धशतक केले असते ते त्याची ही अ दर्जाच्या क्रिकेटमधील 100 वी 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी ठरली असती.
विराटने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 254 सामन्यात 11872 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 43 शतकांचा आणि 56 अर्धशतकांचा समावेश आहे.
आज पार पडलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात शिखर धवनने नाबाद 75 धावांची खेळी केली आहे. तत्पूर्वी न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करताना 38 षटकात सर्वबाद 157 धावा करता आल्या होत्या.
या सामन्यात भारताकडून कुलदीप यादवने 39 धावांत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 19 धावांत 3, युजवेंद्र चहलने 43 धावांत 2 आणि केदार जाधवने 17 धावांत 1 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनीचा तो सल्ला कुलदीप यादवसाठी ठरला सर्वात मौल्यवान, पहा व्हिडिओ
–शिखर धवनने १०वी धाव घेताच केला हा गब्बर विक्रम
–मोहम्मद शमीने केली कमाल, भारताकडून केली विकेट्सची सेंच्यूरी पूर्ण