---Advertisement---

केन विलियम्सनबद्दलची खास आठवण सांगताना विराट कोहली म्हणाला…

On: गुरूवार, जानेवारी 2, 2020 8:05 PM
---Advertisement---

भारताचा कर्णधार विराट कोहलीने ( Virat Kohli) न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनची (Kane Williamson) प्रशंसा केली आहे.

19 वर्षाखालील 2008 विश्वचषकातील उपांत्य सामन्याबद्दल आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात विराट म्हणाला की, “मला आठवते की विलियम्सनविरुद्ध मी वनडेतील उपांत्य सामन्यात खेळत होतो. तो न्यूझीलंड संघाच्या नेहमी पाठीशी असायचा. तसेच, त्याने संघातील इतर खेळाडूंपेक्षा उत्कृष्ट फलंदाजीदेखील केली आहे.”

“मला चांगले माहिती आहे की त्यावेळी या बॅचमध्ये बरेच चांगले खेळाडू होते. जसे की, विलियम्सन, स्टीव्ह स्मिथ (Steve Smith). या खेळाडूंनी आपापल्या संघाकडून चांगली कामगिरी केली होती,” असेही कोहली यावेळी म्हणाला.

2008 च्या 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात (Under 19 World Cup In 2008) भारताचा (India) कर्णधार असलेला विराट कोहली आणि न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार असलेला केन विलियम्सन उपांत्य सामन्यात आमने-सामने आले होते. त्यावेळी भारत आणि न्यूझीलंड संघात उपांत्य सामना झाला होता.

खास गोष्ट म्हणजे 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारताकडून रविंद्र जडेजाही खेळला होता. तर न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथीही खेळले होते. हे खेळाडू सध्या आपापल्या देशाच्या वरिष्ठ राष्ट्रीय संघाकडून खेळतात.

2008च्या 19 वर्षाखालील विश्वचषकात विराटने 6 सामन्यांमध्ये 47च्या सरासरीने एकून 235 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 1 शतकाचा समावेश होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---