मँचेस्टर। आज (27 जून) 2019 क्रिकेट विश्वचषकात 34 वा सामना ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडीयमवर भारत विरुद्ध विंडीज संघात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला एक मोठा पराक्रम करण्याची संधी आहे.
या सामन्यात विराटने जर 37 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा पार करेल.
विराटच्या सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 375 सामन्यातील 416 डावात 56.39 च्या सरासरीने 19963 धावा आहेत. यामध्ये त्याच्या वनडेमधील 11087 धावा, कसोटीमधील 6613 धावा आणि टी20 मधील 2263 धावांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा जगातील 11 खेळाडूंना पार करता आला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे. त्यामुळे विराटने जर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा पार केला तर तो असे करणारा तिसराच भारतीय ठरेल.
याचबरोबर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 20 हजार धावा पूर्ण करणाराही फलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराच्या नावावर आहे.
सचिन आणि लारा या दोघांनीही 453 डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावांचा टप्पा गाठला होता. तर विराटला आज त्यांच्यापेक्षा तब्बल 36 डाव कमी खेळत म्हणजेत 417 व्या डावातच हा टप्पा गाठण्याची संधी आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –
34357 धावा – सचिन तेंडुलकर
24208 धावा – राहुल द्रविड
19963 धावा – विराट कोहली
18575 धावा – सौरव गांगुली
17253 धावा – विरेंद्र सेहवाग
17083 धावा – एमएस धोनी
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडियासाठी ही आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी…
–ठरलं! ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेल तेव्हा करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
–पीटरसनने केलेल्या त्या टीकेवर मॉर्गनने दिले असे उत्तर, पहा व्हिडिओ






