सिडनी। रविवारी(6 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात टी20 मालिकेतील दुसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. या सामन्यात विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील त्याच्या कर्णधारपदाची यशस्वी घोडदौड काय राखण्याच्या मनिषाने उतरेल.
भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा तीन किंवा त्यापेक्षा जास्त सामन्याच्या टी-20 मालिकेत कामगिरी खूपच चांगली राहिली आहे. ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी विराट कोहलीने 11 वेळा तीन किंवा त्यापेक्षा जास्त सामन्याच्या टी-20 मालिकेत संघाचे नेतृत्व केले आहे. ज्यामधे त्याला एकदाही मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला नाही. ऑस्ट्रेलिया सोबत सुरू असलेल्या टी-20 मालिकेत ही भारतीय संघाने 1-0 या फरकाने आघाडी घेतली आहे.
त्यामुळे जर रविवारचा सामना भारताने जिंकला तर विराटच्या नेतृत्वाखाल 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या टी20 मालिकेत पराभूत न होण्याची भारताची ही सलग 12 वी वेळ असेल.
2017 मध्ये पहिल्यांदा विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तेव्हा इंग्लंडला भारताने 2-1 फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-20 मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली होती. 2018 मध्ये ही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे तीन सामन्याची टी-20 मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली होती. भारताने शेवटची तीन किंवा त्यापेक्षा जास्त सामन्याची टी-20 मालिका न्यूझीलंड विरुद्ध खेळली होती. ज्यामध्ये भारताने 4-0 या फरकाने विजय मिळवला होता.
कर्णधार म्हणून तीन किंवा त्यापेक्षा जास्त सामन्याच्या टी-20 मालिकेतील विराटची कामगिरी.
2-1 विरुद्ध इंग्लंड, 2017
1-1 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2017
2-1 विरुद्ध न्यूझीलंड, 2017
2-1 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2018 (शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा कर्णधार होता)
2-1 विरुद्ध इंग्लंड, 2018
1-1 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2018
3-0 विरुद्ध वेस्ट इंडिज, 2019
1-1 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2019
2-1 विरुद्ध वेस्ट इंडिज, 2019
2-0 विरुद्ध श्रीलंका, 2020
4-0 विरुद्ध न्यूझीलंड, 2020
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी20 मालिकेत रोहितच्या अनुपस्थितीत फलंदाजीची जबाबदारी विराटवर
दुखापतीमुळे रोहित शर्मा या टी20 मालिकेचा भाग नाही, अशा स्थितीत विराटवर अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यात सुद्धा विराटला चांगली कामगिरी करता आली नाही. अशात आपल्या फलंदाजीमध्ये सुधारणा करून सामना जिंकून मालिका विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. भारताला वनडे मालिकेत 2-1 या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कन्कशन सब्स्टीट्युट’ म्हणून चहलला संधी दिल्याबद्दल अनिल कुंबळे म्हणाला…
दुसऱ्या टी२० सामन्यासाठी असे असू शकतात भारत-ऑस्ट्रेलिया ११ जणांचे संघ
भारत-ऑस्ट्रेलिया सराव सामना : शुभमन गिल-पृथ्वी शॉ शुन्यावर बाद, तर रहाणे आणि पुजारा….
ट्रेंडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
‘बर्थडे बॉय’ रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?
भारताच्या ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंचा आज आहे वाढदिवस