गुरुवारी (2 नोव्हेंबर) वानखेडे स्टेडिअम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात स्पर्धेचा 33वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारत नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीला उतरला. यावेळी भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याने टिच्चून फलंदाजी केली, पण तो शतक झळकावू शकला नाही. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील 49 वे शतक ठरले असते. मात्र, असे असले तरी त्याने यादरम्यान पाच विक्रम आपल्या नावे केले.
कर्णधार रोहित शर्मा पहिल्या षटकात बाद होऊन परतल्यानंतर विराट व गिल यांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी रचली. मात्र हे दोघेही शतक पूर्ण करू शकले नाहीत. विराटने 94 चेंडूंमध्ये 11 चौकारांच्या मदतीने 88 धावा केल्या. या सामन्यात शतक पूर्ण करत त्याला सचिनच्या 49 वनडे शतकांची बरोबरी करण्याचे संधी होती. असे असले तरी पाच नवे विक्रम त्याच्या नावे आता जमा झाले आहेत.
विराट एका कॅलेंडर वर्षात आठ वेळा 1000 वनडे धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरला. आशिया खंडात वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 8000 धावा करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला. त्याने 159 डावात हा पराक्रम केला. याबरोबरच श्रीलंकेविरुद्ध तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून त्याने चार हजार धावांचा पल्ला पार केल. यासोबतच सलामीला फलंदाजीला न येता ही विश्वचषकात सर्वाधिक वेळा अर्धशतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. तर भारतासाठी त्यांनी या विश्वचषकात सर्वाधिक धावा देखील केल्या आहेत.
(Virat Kohli New Five Records Against Srilanka In ODI World Cup)
हेही वाचा-
आशिया खंडातील ‘किंग’ विराटच! वानखेडेवर मोडला सचिनचा ‘तो’ Record
वानखेडेवर श्रीलंकेने भारताला दिलं फलंदाजीचं आमंत्रण, रोहितसेनेत कोणताही बदल नाही; पाहा Playing XI