काल भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात शिखर धवनने ९० चेंडूत १३२ धावांची तुफानी खेळी केली. त्यामुळे अपेक्षितपणे चर्चा त्यावर व्हायला हवी होती परंतु ७० चेंडूत ८२ धावा करणाऱ्या विराटवरच सर्वांचा ‘फोकस’ राहिला कारण धावांचा पाठलाग करताना ह्या पट्ठ्याने केलेले अनेक विक्रम.
धावांचा पाठलाग करताना वनडे या क्रिकेटच्या प्रकारात विराट सारखा खेळाडू शोधून सापडणार नाही. अगदी मास्टर ब्लास्टर सचिनचेही अनेक विक्रम त्याने याबाबतीत त्याने मोडून काढले आहे. कालच्या सामन्यातही त्याने असेच काही विक्रम मोडले आहेत त्या विक्रमांचा हा लेखाजोखा …
#१ विराट कोहलीच्या वनडेमधील ४४ अर्धशतकांमधील ११ अर्धशतके ही श्रीलंकेविरुद्ध
#२ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीची ८०-९० धावांमधील ही ६वी खेळी.
#३ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीची वनडे सरासरी ६७.३२ आणि पाठलाग करताना जिंकलेल्या सामन्यातील सरासरी १००.०२, कर्णधार म्हणून धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीची वनडे सरासरी १२३.५५
#४ धावांचा पाठलाग करताना जिंकलेल्या सामन्यातील गेल्या १२ महिन्यातील विराटच्या खेळी. ८५,१५४,१२२,७६,९६,१११,८२
#५ धावांचा पाठलाग करताना जिंकलेल्या सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू. सचिन तेंडुलकर(५४९०), रिकी पॉन्टिंग(४१८६), विराट कोहली(४००१)
#६ धावांचा पाठलाग करताना जिंकलेल्या सामन्यातील सर्वाधिक सरासरी राखणारे खेळाडू (कमीतकमी ४००० धावा): विराट कोहली(१००.०२), रिकी पॉन्टिंग(५७.३४). सचिन तेंडुलकर(५५.५४)
#७ डे-नाइट सामन्यात धावांचा पाठलाग करताना सार्वधिक धावा करणारे खेळाडू: विराट कोहली(४२६८), सचिन तेंडुलकर(४२४०)