शनिवार, 23 मार्चपासून आयपीएलचा 12 वा मोसम सुरु होत आहे. या मोसमातील पहिलाच सामना हा गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. त्यामुळे सर्वांनाचा या सामन्याची उत्सुकता आहे.
चेन्नईने आत्तापर्यंत तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. तर बेंगलोरला मात्र एकदाही हे विजेतेपद मिळवण्यात यश आलेले नाही. बेंगलोरच्या या अपयशामागील कारण कर्णधार विराट कोहलीने शनिवारी(16 मार्च) स्पष्ट केले आहे. त्याने चूकीचे निर्णय हे बेंगलोरच्या अपयशामागील कारण असल्याचे सांगितले आहे.
शनिवारी कोहली प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहरासह आरसीबी ऍपच्या लॉन्चसाठी एका कार्यक्रमात उपस्थित होता.
कोहली म्हणाला, ‘तूम्ही जर चूकीचे निर्णय घेणार असाल तर तूम्ही पराभूत होता. मोठ्या सामन्यांमध्ये आमचे निर्णय योग्य नव्हते. ज्या संघाची निर्णय क्षमता संतूलित असते, त्या संघांनी आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.’
तसेच त्याने सांगितले, ‘इतक्या वर्षांनंतरही आणि तीन वेळा अंतिम सामने आणि तीन वेळा उपांत्य सामने खेळल्यानंतरही आमच्या हातात विजेतेपदाची ट्रॉफी आलेली नाही. आम्हाला मोसमाच्या सुरुवातीला कधीही उत्साहाची कमी भासली नाही आणि तेच माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे आणि असे तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपल्याकडे असे चाहत्यांचे प्रोत्साहन असेल.’
आयपीएल 2019 च्या मोसमातील पहिल्या 17 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकाप्रमाणे बेंगलोर 5 एप्रिल पर्यंत 5 सामने खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–या दिवशी होणार आयपीएल २०१९ चे संपूर्ण वेळापत्रक घोषित