भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तिसरा सामना शनिवार, 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळला जाणार आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली जेव्हाही मैदानावर उतरतो, तेव्हा एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे करतो. कोहली या सामन्यातही मैदानात उतरताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर करेल.
वास्तविक, किंग कोहलीचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100 वा सामना असेल. कांगारूंविरुद्ध 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो जगातील केवळ दुसरा खेळाडू ठरणार आहे. कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 27 कसोटी, 49 एकदिवसीय आणि 23 टी20 सामने खेळले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिननं कांगारूंविरुद्ध एकूण 110 सामने खेळले असून त्यात त्यानं 49.68 च्या उत्कृष्ट सरासरीने 6707 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विक्रमाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 99 सामन्यांमध्ये 50.24 च्या उत्कृष्ट सरासरीनं 5326 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू –
सचिन तेंडुलकर- 110
विराट कोहली – 99*
डेसमंड हेन्स – 97
महेंद्रसिंह धोनी – 91
व्हिव्हियन रिचर्ड्स – 88
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. भारतानं पर्थ कसोटीत 295 धावांच्या मोठ्या फरकानं विजय मिळवत मालिकेची दमदार सुरुवात केली होती. यानंतर, ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूनं दुसरी कसोटी खेळली गेली, जिथे कांगारूंनी कमबॅक करत भारताचा 10 गडी राखून पराभव केला. अशाप्रकारे कांगारुंनी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता गाबामध्ये होणारी तिसरी कसोटी दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
हेही वाचा –
IND vs AUS: टीम इंडियाने गाबा कसोटीत सलामीची जोडी बदलावी? या दोन कारणांमुळे बदलाची शक्यता
IND VS AUS; ब्रिस्बेन कसोटीत विराट कोहलीकडे हे तीन विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी
IND vs AUS: तिसऱ्या कसोटीपूर्वी जय शहा अचानक ऑस्ट्रेलियात, मोठे कारण उघड