विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 33व्या सामन्यात वानखेडे स्टेडिअमवर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध खेळत आहे. पहिल्याच षटकात कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने धक्का बसल्यानंतर भारतासाठी विराट कोहली व शुबमन गिल यांनी शतकी भागीदारी केली. यादरम्यान विराटने अनेक विक्रम आपल्या नावे केले. त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा एक मोठा विश्वविक्रम यावेळी उद्ध्वस्त केला.
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला या सामन्यात फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. पहिल्याच चेंडूवर शानदार चौकार मारल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचा दिलशान मधुशंका याने त्रिफळा उडवला. त्यानंतर विराट कोहली व शुबमन गिल ही जोडी जमली. दोघांनी देखील आपली अर्धशतके धडकावत भारताला शतकी मजल मारून दिली. यादरम्यान विराटने सचिन तेंडुलकर याचा सर्वाधिक वेळा एका वर्षात वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम मोडीत काढला.
विराटने आपल्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत तब्बल आठ वेळा एका वर्षात वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. सचिनने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत सात वेळाअशी कामगिरी नोंदवली होती. तर, श्रीलंकेचा कुमार संगकाराने सहा वेळा असा कारनामा करून दाखवला होता.
विराटने या वेळी आशिया खंडात वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 8000 धावा करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला.
(Virat Kohli pass Sachin Tendulkar He Scored Most 1000 Runs in year In ODI)
हेही वाचा-
आशिया खंडातील ‘किंग’ विराटच! वानखेडेवर मोडला सचिनचा ‘तो’ Record
वानखेडेवर श्रीलंकेने भारताला दिलं फलंदाजीचं आमंत्रण, रोहितसेनेत कोणताही बदल नाही; पाहा Playing XI