भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शुबमन गिल यांच्या सारख्या युवा खेळाडूंच्या आत्मविश्वासाचे आणि परिपक्वतेचे कौतुक केले आहे. तसेच त्याने आयपीएल सारख्या स्पर्धांमधून या खेळाडूंसाठी आत्मविश्वास मिळतो असे देखील म्हटले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विराटने या युवा खेळाडूंबद्दल म्हटले आहे की ‘ते शानदार आहेत. त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो पाहणे मस्त आहे. मी याआधीही खूपदा म्हटले आहे की वयाच्या 19-20 व्या वर्षी आम्ही, हे खेळाडू जसे आहेत त्याच्या अर्धेही नव्हतो.’
‘आयपीएलसारख्या स्पर्धांमुळे त्यांच्यातील कौशल्य वाढले आहे. क्रिकेटपटूबरोबर होणारी ही सर्वोत्तम गोष्ट आहे.’
‘ते इथे येईपर्यंत त्यांच्यात खूप आत्मविश्वास आलेला असतो. ते अनेक लोकांसमोर आधीच खेळलेले असल्याने ते त्यांच्या चूकांमधून लवकर शिकतात. पण हेतू हाच असला पाहिजे की ‘मी या प्लॅटफॉर्मचा उपयोग माझ्या देशासाठी खेळण्यासाठी करत आहे.’ आणि मला वाटते हे खेळाडू त्या मनस्थितीत असतात.’
याबरोबरच विराटने ड्रेसिंग रुममधील वातावरणाबद्दलही खूलासा केला आहे. तो म्हणाला, ‘रागवण्याचे वातावरण आता चेंजरुममध्ये (ड्रेसिंग रुममध्ये) राहिलेले नाही. मी जसा कुलदीप यादवबरोबर मैत्रीपूर्ण असतो तसाच मी एमएस धोनीबरोबर मैत्रीपूर्ण असतो.’
‘वातावरण असे आहे की कोणीही कोणालाही काहीही बोलू शकतो. मी खेळाडूंकडे जाऊन म्हणू शकतो ‘हे पहा मी ही चूक केली आहे, तू करु नको.”
तसेच विराट पुढे म्हणाला, ‘मला वाटते खेळाडूंना प्रोत्साहन दिल्याने त्यांची कारकिर्द 2-3 वर्षाने सुधारते. मी त्यांना(युवा खेळाडूंना) त्यांची स्पेस देतो. त्यांच्याशी बोलतो, ते सध्या कुठे आहेत आणि त्यांना कुठे असायला हवे किंवा ते कुठे जाऊ शकतात.’
‘मी त्यांना असेही सांगतो की मला असे वाटत नाही की तूमच्या कारकिर्दीतील दोन-तीन वर्षे खराब व्हावी. त्यामुळे तूम्ही आत्तापर्यंत जेवढे खेळले त्यापेक्षा अधिक चांगले खेळले पाहिजे.’
त्याचबरोबर विश्वचषकातील पराभवाबद्दल विराट म्हणाला, ‘मी माझ्या आयुष्यात अपयशातून खूप काही शिकलो आहे. वाईच अपयश मला फक्त प्रेरणा देत नाही तर माझ्यात व्यक्ती म्हणून सुधारणा करते. यशापेक्षाही मला त्या वेळेचे महत्त्व समजून घेण्यात मदत होते.’
‘महत्त्वाचे म्हणजे यामुळे तूमचे व्यक्तिमत्व तयार होते. कारण या गोष्टी अचानक होतात. जेव्हा तूम्हाला विश्वास असतो आणि सर्वजण चांगले खेळत असतात आणि अचानक तूम्हाला कळते तूम्ही पराभूत झाले आहात. हे पचवणे खूप अवघड आहे. कारण तूम्हाला माहित आहे की तूम्ही खूप चूका केल्या नाही की तूम्ही स्पर्धेच्या बाहेर पडाल.’
‘जेव्हा तूम्ही चूका करता तेव्हा त्याचा स्विकार करुन त्याची जबाबदारी घेऊ शकता. पण तूम्ही खूप चूका न करता बाहेर पडल्यावर त्याच्या स्विकार करणे कठिण जाते. तूम्ही झोपेतून उठल्यावर विचार करता की तूम्ही जास्त चूका केल्या नाही पण तरीही तूम्ही बाहेर पडला आहात.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–कसोटी क्रमवारीत विराट अव्वल स्थानी कायम, जाणून घ्या अन्य भारतीय खेळाडूंची क्रमावारी
–आर अश्विन पुन्हा चर्चेत, गोलंदाजी ऍक्शन बदलत केले फलंदाजाला बाद, पहा व्हिडिओ
–विश्वचषकानंतर निवृत्ती घेणार होता धोनी, पण विराटने त्याला थांबवले?