आयपीएल 2024 च्या हंगामातील एलिमिनेटर सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान राॅयल्स या दोन संघांमध्ये होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे.
विराट कोहलीनं या हंगामात 14 सामन्यांमध्ये सर्वाधिक 708 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने 5 अर्धशतक तर 1 शतक झळकावलं आहे. परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, प्ले-ऑफ मध्ये कोहलीची आकडेवारी खूप खराब आहे. त्यामुळे आज विराट कोहलीवर सर्वांची नजर असणार आहे.
आयपीएलच्या प्ले-ऑफ मध्ये फलंदाजी करत असताना कोहलीची सरासरी केवळ 25.66 एवढी आहे. त्याचा स्ट्राईक रेटदेखील चांगला नाही. कोहलीनं प्ले ऑफमध्ये केवळ 120.31 च्या स्ट्राइक रेटसह 308 धावा केल्या आहेत. प्ले-ऑफ मध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 70 आहे.
आरसीबीनं प्ले-ऑफ मध्ये आतापर्यंत 5 सामने जिंकले आहेत. त्यामध्ये विराट कोहलीची धावसंख्या 24, 8, 12, 0, 25 अशी राहिली आहे. यादरम्यानं त्याच स्ट्राईक रेट 94.52 तर सरासरी 17.25 राहिली आहे. तर प्ले-ऑफमधील 9 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामध्ये कोहलीची धावसंख्या 7, 9, 70*, 35, 12, 54, 6, 39, 7 अशी राहिली आहे. यादरम्यानं त्याच स्ट्राईक रेट 130.60 तर सरासरी 29.87 राहिली आहे.
आयपीएल 2024 च्या या हंगामात ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. तर सर्वाधिक षटकार मारण्याच्या शर्यतीत तो 37 षटकारांसह दुसऱ्या स्थानी आहे. कोहलीची या हंगामातील सर्वाधिक धावसंख्या नाबाद 113 आहे. कोहलीनं आतापर्यंत साखळी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. परंतु आता त्याला प्ले-ऑफमध्ये संघाला विजय मिळवून देण्यासाठी चांगली कामगिरी करावीच लागेल. आजच्या सामन्यात बंगळुरुला कोहलीकडून योगदानाची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या-
रेप केसमुळे अमेरिकेनं व्हिजा नाकारला, ‘या’ स्टार क्रिकेटपटूची वर्ल्डकपवारी हुकली
क्रुणाल पांड्यामुळे जवळपास संपलं होतं आरसीबीच्या स्वप्निल सिंगचं करिअर! नेमकं काय घडलं? जाणून घ्या