---Advertisement---

श्वानप्रेमी विराट! प्रॅक्टिस सेशनमध्ये दाखल झालेल्या पपीचा केला लाड, खेळला फुटबॉल

On: शनिवार, सप्टेंबर 9, 2023 5:06 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धा खेळत आहे. साखळी फेरीतून पुढे गेल्यानंतर भारतीय संघ आता रविवारी (10 सप्टेंबर) सुपर फोर फेरीतील आपला पहिला सामना खेळेल. भारतीय संघाला या सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करायचे आहेत. तत्पूर्वी, भारतीय संघाचे 8 सप्टेंबर रोजी सराव सत्र पार पडले. यामध्ये भारतीय संघ सराव करत असताना एका श्वानाच्या पिल्लाने मैदानात एन्ट्री केली. त्यावेळी विराट त्याच्याशी खेळताना दिसला.

भारतीय संघाने आपला अखेरचा साखळी सामना चार सप्टेंबर रोजी कॅंडी येथे खेळलेला. त्यानंतर सुपर फोर सामन्यांसाठी भारतीय संघ कोलंबो येथे पोहोचला आहे. शुक्रवारी पार पडलेल्या सराव सत्रात भारतीय खेळाडू फुटबॉल खेळत असताना एक छोटे कुत्र्याचे पिल्लू मैदानात आले. भारतीय खेळाडू सर्कलमध्ये फुटबॉल खेळत असताना विराट कोहली याने खाली बसून त्याला आपल्याकडे बोलावले. ते पिल्लू जवळ आल्यानंतर विराटने त्याचे दोन पाय आपल्या हातावर घेतले.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1700164877841756420?t=o1ucTwoT9Y29Oi6JXhh-Dg&s=19

त्यानंतर आपल्याकडे येत असलेला फुटबॉल पाहून ते पिल्लू फुटबॉलसोबत खेळू लागले. त्यानंतर स्वतः विराटने त्याच्याकडे फुटबॉल ढकलला. मात्र यावेळी ते पिल्लू दुसरीकडे पळाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

विराट कोहली याची या स्पर्धेतील सुरुवात चांगली झाली नाही. पाकिस्तानविरुद्ध तो केवळ चार धावा करून बाद झालेला. तर नेपाळविरुद्ध त्याला फलंदाजीचे संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आता सुपर फोर फेरीत त्याच्याकडे तिन्ही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी असेल. तसेच आगामी विश्वचषकात भारतीय संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

(Virat Kohli Play With Puppy At Colombo Practice Session Video Viral)

महत्वाच्या बातम्या – 
SL vs BAN Toss: सुपर फोरमधील दुसऱ्या सामन्यात ‘हा’ संघ ‘टॉस का बॉस’, एक बदलासह बांगलादेश उतरणार मैदानात
लखनऊची ताकद वाढली! ‘या’ 9 स्टाफच्या जोरावर पटकावणार IPL 2024चं विजेतेपद, नावं पाहून हादरून जाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---