भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना आज (२८ मार्च) खेळविला जात आहे. पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर हा सामना होईल. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात कर्णधार म्हणून मैदानावर उतरताच एका खास विक्रमाला गवसणी घातली.
अशी कामगिरी करणारा विराट आठवा कर्णधार
मागील दोन महिन्यांपासून भारतात असणाऱ्या इंग्लंडचा हा दौरा आज संपत आहे. संपूर्ण दौऱ्यावरील हा अखेरचा सामना आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली मैदानात उतरताच एका विशिष्ट विक्रमाचा मानकरी ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराटचा हा २०० वा सामना आहे. त्याच्याआधी विविध देशांच्या सात कर्णधारांनी अशी कामगिरी नोंदवली होती. २०१५ मध्ये तो भारताच्या कसोटी संघाचा नियमित कर्णधार बनला होता. तर, २०१७ मध्ये त्याच्याकडे मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद देण्यात आले.
यादीत धोनी अव्वलस्थानी
आपल्या देशाचे सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व करण्याचा मान भारताच्याच एमएस धोनीकडे जातो. त्याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये म्हणून भारताचे ३३२ सामन्यात नेतृत्व केले होते. त्यानंतर, दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान कर्णधार रिकी पाँटिंग आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचे ३२४ सामन्यात कर्णधारपद भूषविले होते. ३०३ सामन्यांसह न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग तिसऱ्या तर, २८६ सामन्यासह दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ चौथ्या क्रमांकावर आहे.
या यादीमध्ये ऑस्ट्रेलियाचे ऍलन बॉर्डर (२७१ सामने), अर्जुन रणतुंगा (२४९ सामने) व मोहम्मद अझरुद्दीन (२२१ सामने) हे अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानी आहेत.
तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली(कर्णधार), केएल राहुल, रिषभ पंत, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा
महत्त्वाच्या बातम्या –
अरेरे! विराटचा भिडू आंतरराष्ट्रीय पदापर्णात सपशेल फ्लॉप, पहिल्याच चेंडूवर झाला बोल्ड
ऐकलंत का! सामन्यापुर्वी लेडीज परफ्यूम लावतो बेन स्टोक्स, कारण ऐकून खदखदून हसाल