---Advertisement---

रणजी सामन्यासाठी विराट दिल्ली संघात सामील, घरच्या मैदानावर कोहली अनोख्या अंदाजात, पाहा VIDEO

On: मंगळवार, जानेवारी 28, 2025 2:17 PM
---Advertisement---

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली 13 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार आहे. यासाठी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) सोमवारी संघाची घोषणा केली. ज्यामध्ये विराट कोहलीचे नाव देखील समाविष्ट आहे. सरावसाठी विराट आज सकाळी संघात सामील झाला, ज्यात त्याने जंगी सराव केला.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये विराट कोहलीने त्याच्या राज्य संघाच्या खेळाडूंसोबत सरावात भाग घेतला. दिल्लीला 30 जानेवारीपासून या मैदानावर रेल्वेविरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्यात कोहली आयुष बदोनीच्या नेतृत्वाखाली खेळेल.

यादरम्यान, कोहलीने संघातील खेळाडूंसोबत वॉर्मअप केले. त्याने नेट सरावातही भाग घेतला आणि संघातील खेळाडूंसोबत मजा केली. कोहलीच्या सरावाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये तो नेट प्रॅक्टिसची तयारी करताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो संघाच्या खेळाडूंसोबत फुटबॉल खेळताना दिसत आहे.

फुटबॉल खेळताना कोहली मस्तीच्या मूडमध्ये दिसला. त्याने त्याच्या टीममेट्सनाही या मजामध्ये सहभागी करून घेतले. त्याच्या आगमनाने संघात उत्साह दिसून येत आहे. सध्याच्या संघात, नवदीप सैनी हा एकमेव खेळाडू आहे जो कोहलीसोबत खेळला आहे.

विराट कोहली 13 वर्षांनंतर रणजी ट्रॉफी सामना खेळताना दिसणार आहे. यापूर्वी 2012 मध्ये त्याने गाझियाबादमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध रणजी ट्रॉफी सामना खेळला होता. डीडीसीएने विराट कोहलीसाठी खास तयारी केली आहे. रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान सहसा स्टेडियमचा फक्त एकच दरवाजा उघडा राहतो. परंतु कोहलीच्या आगमनामुळे चाहत्यांसाठी स्टेडियमचे तीन अतिरिक्त दरवाजे उघडले जातील जेणेकरून ते सामन्याचा आनंद घेऊ शकतील. रणजी सामने प्रेक्षकांसाठी मोफत आहेत.

डीडीसीएने स्टेडियमची सुरक्षाही वाढवली आहे. साधारणपणे स्टेडियममध्ये 10 ते 12 खाजगी रक्षक असतात. परंतु आता त्यांची संख्या वाढवण्यात येईल जेणेकरून विराट कोणत्याही अडथळ्याशिवाय तयारी करू शकेल. डीडीसीएने या सामन्याबाबत दिल्ली पोलिसांनाही कळवले आहे.

हेही वाचा-

अफगाणिस्तानच्या खेळाडूनं रचला इतिहास, पहिल्यांदाच जिंकला हा मोठा आयसीसी पुरस्कार
सोलापूरमध्ये क्रिकेटचा मोठा सामना, हा भारतीय क्रिकेटर दिसणार ॲक्शनमध्ये
आयसीसीचे अध्यक्ष जय शहा कुटुंबासह कुंभमेळयात, घेतला संतांकडून आशीर्वाद, पाहा VIDEO

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---