---Advertisement---

…तब तक छोडेंगे नही! सनरायझर्सविरूद्धच्या सामन्यापूर्वी सरावात दिसला किंग कोहलीचा रुद्रावतार; पाहा व्हिडिओ

On: बुधवार, ऑक्टोबर 6, 2021 10:33 AM
---Advertisement---

विराट कोहलीचा नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाने सलग दुसऱ्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या ( आयपीएल ) प्ले ऑफसाठी पात्रता मिळवली आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात सध्या ते तिसऱ्या क्रमांकावर असून, अव्वल दोनमध्ये साखळी फेरी संपविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. संघाचे आणखी दोन सामने शिल्लक असले तरी, संघाचा कर्णधार विराट कोहली कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार नाही. यासाठी बुधवारी ( ६ ऑक्टोबर ) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणाऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कसून सराव करताना दिसला. त्याच्या सरावाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

विराटचा कसून सराव
आरसीबीला आपला पुढील सामना बुधवारी गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरूद्ध खेळायचा आहे. या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये जाण्याचा कर्णधार विराट कोहली व संपूर्ण संघाचा मानस असेल. त्यादृष्टीने, विराट चांगलाच एकाग्र होऊन सराव करताना दिसला. त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये तो कधी पुढे सरसावत उत्तुंग फटके, तर कधी उत्कृष्ट टाईमिंगच्या जोरावर जमिनीलगत फटके मारताना दिसत आहे. त्याने या व्हिडिओला तयारी असे कॅप्शन दिले आहे.

आरसीबी चांगल्या फॉर्ममध्ये
आयपीएलच्या पूर्वार्धात सलग पाच सामने जिंकल्यानंतर युएई येथील उत्तरार्धाची सुरुवात त्यांच्यासाठी चांगली झाली नव्हती. पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी लागोपाठ राजस्थान, मुंबई व पंजाबला पराभूत करत दोन सांनी शिल्लक असतानाच प्ले ऑफचे तिकीट पक्के केले. ग्लेन मॅक्सवेल, देवदत्त पडिक्कल, विराट व श्रीकर भरत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याच्या नावे पर्पल कॅप असून, अनुभव फिरकीपटू युजवेंद्र चहल पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. आरसीबी आपला अखेरचा सामना दिल्ली विरुद्ध खेळणार आहे. एबी डिव्हिलियर्स व मोहम्मद सिराज यांचा फॉर्म संघासाठी काहीशी चिंतेची बाब असली तरी, संघ त्यातून लवकरच पुढे जाण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---