टी२० विश्वचषकातील भारतीय संघाचा दुसरा सामना रविवारी (३१ ऑक्टोबर) दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. पहिल्या सामन्यात दोन्ही संघांना पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर उभय संघ विजयाचा प्रयत्न करतील. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार विराट कोहली हा प्रसारमाध्यमांना सामोरा गेला. या पत्रकार परिषदेत त्याने संघा संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
हार्दिक शार्दुलबद्दल म्हटला ही गोष्ट
या पत्रकार परिषदेत विराटला पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले. भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या तंदुरुस्तीविषयी प्रश्न विचारला असता, तो म्हणाला,
“हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त आहे.” तसेच या सामन्यासाठी संघात सामील करण्याची मागणी होत असलेल्या शार्दुल ठाकुर याच्याविषयी बोलताना विराटने म्हटले,
“शार्दुल नेहमीच आमच्या योजनांचा भाग राहिला आहे. त्याच्यामध्ये खूप क्षमता आहे. आम्ही संघाच्या निवडीबद्दल आत्ताच काही बोलू शकत नाही.” पहिल्या सामन्यात खराब गोलंदाजी केल्यामुळे अनुभवी भुवनेश्वर कुमार याला संघाबाहेर करण्याची मागणी होत आहे. तो धागा पकडून विराट म्हणाला,
“केवळ एकट्याला दोष देणे चुकीचे आहे. आम्ही एक गट म्हणून बळी घेण्यात अपयशी ठरलो. आम्ही मागे वळून पाहतो व झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न करतो.”
शमीच्या ट्रोलिंगविषयी महत्त्वपूर्ण विधान
पाकिस्तान विरुद्ध महागडा ठरल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर अनेक चाहत्यांनी धार्मिक टीका केली होती. त्याला उत्तर देताना विराटने सांगितले,
“आम्ही मैदानावर खेळत असतो. सोशल मीडियावर अशा मानसिक रोग्यांशी सामना करत नाही. एक संघ म्हणून मानसिकदृष्ट्या आम्ही खूप कणखर आहोत. शमीवर टीका करणारे लोक डरपोक आहेत. या बाहेरच्या गोष्टींवर आम्ही जास्त लक्ष देत नाही. प्रत्येक सामन्यातून काहीतरी शिकून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.”
???? ???? We exactly know how to approach the matches ahead.#TeamIndia captain @imVkohli on how the side will go about their upcoming #T20WorldCup games. #INDvNZ pic.twitter.com/lChCoNorCQ
— BCCI (@BCCI) October 30, 2021
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने पराभूत केले होते. सलग तीन विजय मिळवून पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार पहिला संघ होण्याच्या उंबरठ्यावर आहे. तर, दुसरीकडे न्यूझीलंड आणि भारत सामन्यातील विजेता संघ पुढे जाऊ शकतो. त्यामुळे या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मागच्या बाजूने धावत जात वोक्सचा भन्नाट एकहाती झेल; व्हिडिओ पाहून कौतुकाने वाजवाल टाळ्या
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचा विश्वविक्रम, बनला एका वर्षात सर्वाधिक टी२० विकेट्स घेणारा गोलंदाज






