क्रिकेटजगतातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक असलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याने नुकताच कसोटी संघाच्या नेतृत्त्वपदाचा राजीनामा (Virat Kohli Resigns) दिला आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका गमावल्यानंतर या ३३ वर्षीय क्रिकेटरने हा निर्णय घेतला आहे. मर्यादित षटकांच्या संघाची कमानही आता त्याच्या हाती नाही. त्यामुळे त्याच्या या निर्णयानंतर आता तो भारतीय क्रिकेट संघात फक्त फलंदाज म्हणून खेळताना दिसेल. परंतु त्याने नेतृत्त्वपद सोडल्यामुळे क्रिकेटमधील काही मोठे विक्रम मोडता मोडता (Unbeaten Records) राहिले आहेत.
‘रनमशीन’ विराटला गेल्या ३ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक करता आलेले नाही. त्याच्या याच शतकाच्या मलालामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मोठा विक्रम पुढील बरीच वर्षे अबाधित राहिल.
व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव।
विराटने २००८ ते २०२२ मधील आपल्या क्रिकेट कारकिर्दीत तब्बल ७० शतके केली आहेत. परंतु त्याच्या ७१ व्या शतकाची प्रतिक्षा अद्यापही संपलेली नाही. २३ नोव्हेंबर २०१९ ला कोलकातामध्ये बांगलादेशविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीत त्याने शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. या सामन्यात त्याने १३६ धावा कुटल्या होत्या. मात्र त्यानंतर अद्यापही त्याच्या बॅटमधून एकही शतक आलेले नाही.
त्यातही विराट आता तिन्ही स्वरुपातील क्रिकेटमध्ये संघनायक (Virat Kohli Captaincy) राहिलेला नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) यांचा मोठा विक्रम आता बरीच वर्षे अबाधित (Rickey Ponting Unbeaten Century Record) राहिल. पाँटिंग यांनी कर्णधाराच्या रूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४१ शतके केली होती. विराटनेही कर्णधार असताना ४१ शतके करत त्यांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. परंतु तो त्यांच्या या विक्रमाला मोडित काढू शकला नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे कर्णधार
विजय कोहली (भारत): २१३ सामने, २५० डाव, ४१ शतके
रिकी पोंटिंग (ऑस्ट्रेलिया): ३२४ सामने, ३७६ डाव, ४१ शतके
ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका): २८६ सामने, ३६८ डाव, ३३ शतके
स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)- ९४ सामने, १२० डाव, २० शतके
माइकल क्लार्क (ऑस्ट्रेलिया)- १३९ सामने, १७१ डाव, १९ शतके
हेही वाचा- विराटच्या उत्तराधिकारीचे नाव निश्चित, मग बीसीसीआय कधी करेल अधिकृत घोषणा? तारिख आली पुढे
याबरोबरच विराट कसोटी कर्णधार म्हणून घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके करण्याच्या पाँटिंगच्या विक्रमापासून फक्त एका शतकाने दूर राहिला आहे. पाँटिंगने घरच्या मैदानावर ११ शतके केली होती. तर विराटच्या बॅटमधून घरच्या मैदानावर १० शतके आली आहेत.
घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके
रिकी पाँटिंग – ३९ सामने, ११ शतके
विराट कोहली – ३१ सामने, १० शतके
ग्रेग चॅपल – ३३ सामने, १० शतके
स्टिव्ह स्मिथ – २१ सामने, १० शतके
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार म्हणून कोहलीची कारकीर्द ‘विराट’च, पण त्याचे ‘हे’ वाद नेहमीच राहणार चर्चेत
विराटच्या उत्तराधिकारीचे नाव निश्चित, मग बीसीसीआय कधी करेल अधिकृत घोषणा? तारिख आली पुढे
“एक गोष्ट खात्रीशीर सांगू शकतो की…”, विराटच्या निर्णयावर बालपणीच्या प्रशिक्षकांची मोठी प्रतिक्रीया
हेही पाहा-