भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (virat kohli) आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघासाठी खेळत आला आहे. त्याने मागच्या हंगामापर्यंत आरसीबीचे नेतृत्व देखील केले. पहिल्या हंगामासाठी जेव्हा विराटला आरसीबीने संघात सामील केले, तेव्हा मोठी रक्कमही खर्च केली होती. आता विराटने त्याच जुन्या आठवणींना उजाळा दिली आहे. विराटने सांगितल्याप्रमाणे पहिल्या ड्राफ्टसाठी त्याला मिळालेल्या रकमेवर त्याचा विश्वास बसला नव्हता.
आरसीबी पॉडकास्टमध्ये बोलताना विराटने आयपीएल २००८ च्या पहिल्या ड्राफ्टची आठवण काढली. पहिल्या हंगामात आरसीबीने विराटला संघात सामील करण्यासाठी ५० हजार अमेरिकी डॉलर्स खर्च केले होते. यासंदर्भात बोलताना विराट म्हणाला की, “त्यावेळी आम्ही सर्वजन मलेशियामध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक खेळत होतो. त्यावेळी १९ वर्षांखालील खेळाडूंच्या ड्राफ्टवर पैसे खर्च करण्याला सीमा होती. तेव्हा आम्हाला जी काही रक्कम मिळाली होती, त्यावर विश्वास बसला नव्हता. परंतु हा अनुभव अप्रतिम होता.”
पॉडकास्टमध्ये बोसताना विराटने इतरही गोष्टींवर चर्चा केली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या आयपीएल हंगामात दिल्ली डेअरडेविल्स त्याला संघात सामील करण्यासाठी इच्छुक होता. पण संघातील ताळमेळ साधण्यासाठी दिल्ली संघाने त्यावेळी वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानला संघात सामील केले. आरसीबीने या पॉडकास्टचा एक भाग अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे. “आरसीबीने मला निवडले. मला असे वाटते की, त्यावेळी मला या गोष्टीचा अंदाज नव्हता की, हा माझ्या आयुष्यातील प्रभावशाली क्षण होता.” असे विराट पुढे बोलताना म्हणाला
The RCB Podcast powered by Kotak Mahindra Bank: Trailer
10 episodes, plenty of interesting and never heard before stories about the tournament that made them the superstars they are!
(1/n)#PlayBold #WeAreChallengers #TheRCBPodcast pic.twitter.com/MWPQG3IEwH— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 1, 2022
दरम्यान, विराटने एकूण ८ वर्ष आरसीबीचे कर्णधारपद सांभाळले. विराटने आयपीएल २०२१ मध्ये जाहीर केले होते की, तो पुढच्या हंगामापासून आरसीबीचे नेतृत्व करणार नाही. पुढच्या हंगामापासून विराट एका खेळाडूच्या रुपात आरसीबीचे प्रतिनिधित्व करेल. तत्पूर्वी विराटने असेही घोषित केले होते की, तो जोपर्यंत आयपीएल स्पर्धेत खेळेल, तोपर्यंत आरसीबीव्यतिरिक्त कोणत्याही संघासाठी खेळणार नाही. अशात आगामी आयपीएल हंगामात विराटला आरसीबीच्या नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात खेळावे लागणार आहे, ज्याची निवड अद्याप झालेली नाही.
महत्वाच्या बातम्या –
अखेर भारतातील सर्वोच्च देशांतर्गत स्पर्धेचा लागला मुहूर्त! रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर
Video: ‘बेबी एबी’नंतर आता दक्षिण आफ्रिकेला मिळाला ‘ज्युनियर रबाडा’, पाहा भेदक गोलंदाजी
ठरलं तर! आयपीएल २०२२ साठी तब्बल ५९० खेळाडूंचा होणार लिलाव; ‘या’ स्टार क्रिकेटपटूंचा समावेश






