---Advertisement---

टॉप ५: ‘रनमशीन’ विराट कोहलीच्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही…

---Advertisement---

मुंबई। काल(11 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात तिसरा टी20 सामना(3rd T20I) वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 67 धावांनी विजय मिळवत टी20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) 29 चेंडूत नाबाद 70 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 7 षटकार मारले. हे विराटचे आंतरराष्ट्रीय टी20मधील 24 वे अर्धशतक होते.

विराटने या टी20 मालिकेत 3 सामन्यात एकूण 183 धावा केल्या आहेत. यात त्याने पहिल्या टी20मध्ये केलेल्या नाबाद 94 धावांच्या खेळीचाही समावेश आहे. तसेच या मालिकेत त्याने एकूण 13 षटकार मारले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला. याबरोबरच विराटने काही विक्रम केले आहेत.

विराटने केले हे विक्रम – 

#भारतासाठी एका टी20 मालिकेत / स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू – 

13 षटकार – विराट कोहली (विरुद्ध वेस्ट इंडिज, 2019)

12 षटकार – युवराज सिंग (2007 विश्वचषक)

11 षटकार – रोहित शर्मा (विरुद्ध श्रीलंका, 2017)

# विराट आंतरराष्ट्रीय टी20मध्ये मायदेशात 1000 धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू. विराटने भारतात खेळताना 29 टी20 सामन्यात 53.20 च्या सरासरीने 1064 धावा केल्या आहेत. 

# आंतरराष्ट्रीय टी20मध्ये विराट सर्वात जलद अर्धशतक करणारा भारतीय कर्णधार. विराटने काल 21 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. 

#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 50+ धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू – 

24 – विराट कोहली

23 – रोहित शर्मा

17 – मार्टिन गप्टिल

#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा 70+ धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू – 

12 – विराट कोहली

11 – रोहित शर्मा

#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिकवेळा मालिकावीर पुरस्कार मिळवणारे क्रिकेटपटू – 

6 – विराट कोहली

3 – ग्लेन मॅक्सवेल/शाकिब अल हसन / बाबार आझम / शाहिद आफ्रिदी / मोहम्मद हाफिज / शोएब मलिक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---