रविवारी (२३ जानेवारी) केपटाऊन येथे भारताविरुद्ध झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ४ धावा राखून विजय मिळवला. या सामना विजयासह त्यांनी भारताला मालिकेत ३-० ने व्हाईटवॉशही दिला आहे. या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनापेक्षा जास्त एका व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधले. ती व्यक्ती होती, भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याची मुलगी वामिका कोहली (Virat Kohli Daughter).
या सामन्यादरम्यान वामिकाचा चेहरा सर्वांसमोर (Vamika Face Revealed) आला. मात्र विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना ही गोष्ट आवडलेली नाही. यानंतर त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करत चाहत्यांना वामिकाचा (Vamika Kohli) फोटो शेअर करण्यापासून थांबण्याची विनंती (Virat Kohli Request) केली आहे.
व्हिडिओ पाहा- आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener
विराटने स्वत: वामिकासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, काल स्टेडियममध्ये आमच्या मुलीचा फोटो क्लिक झाला आहे आणि तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की, अनावधानाने वामिकाचा चेहरा कॅमेरात कैद झाला आहे आणि तेव्हा आम्हाला माहिती नव्हते की, कॅमेराची नजर आमच्यावर होती. अजूनही आमच्या लेकीच्या फोटोंसंदर्भात आमचा दृष्चीकोन पूर्वीसारखाच आहे. आम्ही तुम्हा सर्वांकडून अपेक्षा करतो की, वामिकाचे फोटो क्लिक केले जाणार नाहीत किंवा ते कुठे छापले जाणार नाहीत. यामागचे कारण तेच आहे, जे मी याआधी सांगितले होते.

चाहत्यांना दिसली वामिकाची पहिली झलक
तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी वमिकाचा चेहरा जगासमोर येऊ दिला नव्हता. त्यांचे असे म्हणणे होते की, जोपर्यंत तिला स्वतःहून वाटत नाही, तोपर्यंत तिचा चेहरा जगासमोर आणला जाणार नाही. परंतु तिसऱ्या वनडे सामन्यात कॅमरामनची नजर वामिकावर पडली आणि बघता बघता हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे.
असा पुढे आला वामिकाचा चेहरा
विराटने या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर वामिकाला ते अर्धशतक समर्पित केले. यावेळी कॅमेरामनने वामिकाकडे कॅमेरा फिरवल्याने ती सामना दर्शकांच्या नजरेत आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या २८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने या सामन्यात ८४ चेंडूंचा सामना करताना ५ चौकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या आणि केशव महाराजच्या गोलंदाजीवर टेम्बा बावुमाच्या हाती झेल देत तो बाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
वेल डन डॅडी..! डी कॉकच्या ढांसू शतकीय खेळीला १७ दिवसांच्या लेकीने असे केले चीयर, फोटो व्हायरल
आख्खी टीम राष्ट्रगीतात मग्न असताना विराटचं सुरू होतं भलतंच काही, पाहून प्रचंड संतापले चाहते
हेही पाहा-






