---Advertisement---

‘मला आरसीबीसाठी खेळायला मिळेल का?’, इंग्लंडच्या कर्णधाराच्या प्रश्नावर विराटने दिले ‘हे’ उत्तर

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2020 7:27 PM
---Advertisement---

कोविड-१९ नंतर जनजीवन पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. क्रीडा जगतातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा सध्या सुरू आहेत. त्याचवेळी, बहुतांशी खेळाडू आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सातत्याने पोस्ट करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरी केन याने नुकताच ट्विटरवरून क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओखाली त्याने पुढील वर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळायला मिळेल का? असा प्रश्न भारतीय कर्णधार विराट कोहलीला केलेला दिसून येतोय.

मला आरसीबीसाठी खेळायला मिळेल का?

हॅरी केनने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो आपल्या संघ सहकार्‍यांसोबत क्रिकेट खेळताना दिसून येतोय. व्हिडिओमध्ये केन उत्तम फटकेबाजी करताना दिसून आला. हा व्हिडिओ शेअर करताना केनने त्याखाली कॅप्शन लिहिले आहे की, ‘मला वाटते मी एक चांगली टी२० खेळी केलीय. विराट कोहली, मला पुढील वर्षी आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळायला मिळेल का?’

विराटने दिले मजेशीर उत्तर

केनच्या या ट्विटला रिट्विट करताना विराटने लिहले, ‘छान खेळलास मित्रा, तू काऊंटर ऍटॅकींग फलंदाज म्हणून खेळू शकतोस.’

यापूर्वी आरसीबीने दिले होते प्रत्युत्तर

आरसीबीकडूनही त्याला त्याला चांगली दाद मिळाली, आरसीबीने ट्विट केले की “जर्सी क्रमांक 10 चा खेळाडू हे करेल.”

https://twitter.com/RCBTweets/status/1332308477230780416

विराट आणि केन आहेत खास मित्र

हॅरी केन व विराट कोहली हे चांगले मित्र आहेत. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असताना, विराटने केनची भेट घेऊन त्याच्यासोबत क्रिकेटही खेळले होते. दोघेही सातत्याने आपापल्या सोशल मीडिया खात्यांवरून एकमेकाला मजेशीर गोष्टींमध्ये टॅग करत असतात.

दोघेही मोठ्या स्पर्धांमध्ये आहेत व्यस्त

सध्या विराट भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दौऱ्यावरील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. पहिल्या सामन्यात विराट एक जीवदान मिळाल्यानंतरही मोठी धावसंख्या उभारून शकला नाही. जोस हेजलवूड याच्या गोलंदाजीवर तो ऍरॉन फिंचच्या हाती झेल देत परतला. त्याने, २१ धावा काढल्या.

दुसरीकडे, हॅरी केन इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये टॉटनहॅम हॉटस्पर संघाचे प्रतिनिधित्व करतो. टॉटनहॅम हॉटस्पर संघ ९ सामन्यानंतर गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान आहे. या ९ सामन्यात त्याने ७ गोल झळकावत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये पाचवे स्थान मिळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“विराट, मला RCB मध्ये स्थान मिळेल का?” व्हिडिओ शेअर करत स्टार फुटबॉलपटूचा प्रश्न

‘…आणि मला पुन्हा लय सापडली’, ऑस्ट्रेलियन शतकवीराची मोठी प्रतिक्रिया

ऐकावे ते नवलंच! मुलाला बाद दिले म्हणून एका पंचाने दिली दुसऱ्या पंचाला धमकी

ट्रेंडिंग लेख-

आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’

भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---