---Advertisement---

“या संघाचा हिस्सा असल्याचा…” पीएम मोदींना बोलताना विराटच्या भावना समोर

Virat Kohli (4)
---Advertisement---

भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. भारतीय संघ सामाना जिंकताच मोदींनी वरिष्ठ खेळाडूंशी फोनवर संपर्क साधला होता. विश्वचषक विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती झाहीर केली. विराट कोहली साठी पीएम मोदींनी ‘X’ वर निवृत्तीच्या शुभेच्छा देत प्रतिक्रिया व्यक्त केले.

पीएम मोदींनी लिहिले की, तुमच्याशी बोलून आनंद झाला. अंतिम डावाप्रमाणेच तुम्ही भारतीय फलंदाजीही चमकदारपणे हाताळली आहे. तुम्ही खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. टी20 क्रिकेटला तुमची आठवण येईल, पण मला विश्वास आहे की तुम्ही नव्या पिढीच्या खेळाडूंना प्रेरणा देत राहाल.”

कोहलीने मोदींना उत्तर देत लिहिले, “प्रिय सर, तुमच्या दयाळू शब्दांबद्दल आणि तुमच्या समर्थन आणि प्रोत्साहनाबद्दल खूप खूप धन्यवाद. विश्वचषक घरी पोहोचवणाऱ्या या संघाचा भाग बनणे हा बहुमान आहे. संपूर्ण देशाला विकत घेतलेल्या आनंदाने आम्ही खूप प्रभावित झालो आहोत आणि भारावून गेलो आहोत.

टी20 विश्वचषक 2024 जिंकताच विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती झाहीर केली. यादरम्यान बोलताना म्हणाला की, भारतासाठी हा माझा शेवटचा टी20 सामने आहे. आता पुढच्या पिढीने पुढे जाण्याची वेळ आली आहे. भारतात काही आश्चर्यकारक खेळाडू खेळत आहेत आणि ते टी20 फॉरमॅटमध्ये संघाला पुढे नेणार आहेत. ते भारताचा झेंडा उंच ठेवतील आणि या संघाला येथून पुढे नेईल यात मला शंका नाही.

महत्तवाच्या बातम्या-

लागा तयारीला! या दिवशी टीम इंडिया भारतात पोहोचणार, बीसीसीआयनं केली खास विमानाची व्यवस्था
फक्त ‘त्या’ खेळाडूने कॉल केला नसता तर द्रविड कोच राहिला नसता…
टीम इंडियाच्या 15 जणांच्या सपोर्ट स्टाफमध्ये नक्की आहे तरी कोण-कोण? पाहा संपुर्ण यादी…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---