---Advertisement---

…म्हणून चहल, कुलदीपला मिळाली नाही भारताच्या टी२० संघात संधी, विराटने केला खूलासा

On: रविवार, सप्टेंबर 15, 2019 5:45 PM
---Advertisement---

आजपासून (15 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवला संधी देण्यात आलेली नाही. यामागील कारण भारताचा कर्णधार विराट कोहलीने शनिवारी(14 सप्टेंबर) स्पष्ट केले आहे.

विराट म्हणाला, ‘फलंदाजीच्या फळीतील खोली वाढवणे हे कुलदीप आणि चहलला संघात सामील न करण्यामागील एक कारण आहे. तसेच आम्ही अशा खेळाडूंनाही संधी देऊ इच्छितो, ज्यांनी मागील काही वर्षात देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. संघांतील समतोल शोधण्यासाठी हे सर्व आम्ही करत आहोत आणि आम्हाला एकाच संयोजनावर(कॉम्बिनेशन) अवलंबून रहायचे नाही.’

‘जर जगातील सर्व संघांकडे 9 आणि 10 व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करु शकणारे खेळाडू असतील तर मग आपल्याकडे का नाही. त्यामुळे तूम्हाला कधीतरी हा निर्णय घ्यावा लागेल. जेव्हा चहल, कुलदीपला संघात आणले तेव्हा अनेकांना ते पटले नव्हते. हे सर्व निर्णय संघात संतुलन ठेवण्यासाठी घेतले जातात.’

तसेच विराटने असेही म्हटले की पुढीलवर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकाआधी विविध खेळाडूंना पारखण्याची आत्ताच चांगली संधी आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

व्हिडिओ: स्टिव्ह स्मिथने एका हाताने घेतलेला हा अफलातून झेल पाहिला का?

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होणाऱ्या पहिल्या टी२० सामन्याबद्दल सर्वकाही…

इंजिनियर्स डे विशेष: क्रिकेटमधील ते ११ इंजिनियर…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment