---Advertisement---

रोहित, कोहलीमुळे बीसीसीआय वैतागली, मोहम्मद शमीचं मात्र नाही काहीच टेन्शन

On: शुक्रवार, मे 15, 2020 12:19 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसमुळे मागील काही महिन्यांपासून क्रिकेट बंद पडले आहे. या व्हायसला नष्ट करण्यासाठी देशात लॉकडाऊनचा मोठा निर्णय घेतला आहे. अशामध्ये खेळाडूंना आपापल्या घरात बसण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

आतापर्यंत ३ वेळा लॉकडाऊन करण्यात आले आहे. तिसरे लॉकडाऊन १७ मेला संपणार आहे. असे असले तरी चौथ्या लॉकडाऊनमध्ये जर सूट मिळाली तर १८ मेपासून अव्वल खेळाडू आउटडोअर ट्रेनिंग (Outdoor Training) सुरुवात करतील. कारण ते त्यांच्या फीटनेससाठी गरजेचे आहे. तरी खेळाडू आपापल्या घरामध्ये फीटनेस ट्रेनिंग करत आहेत. परंतु लहान जिम आणि मैदानाच्या ट्रेनिंगमध्ये खूप फरक असतो.

अशामध्ये अधिकतर खेळाडूंना मैदानावर पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआय चिंतेत आहे. तसेच संपूर्णपणे फीट होऊन खेळाडूंच्या पुनरागमनासाठी एक रोडमॅपही बनविला आहे. परंतु एकमेव मोहम्मद शमी (Mohammed Shami) असा अव्वल खेळाडू आहे ज्याच्या फीटनेसबद्दल बीसीसीआयला अधिक काळजी करण्याची काही आवश्यकता नाही.

खरंतर तो लॉकडाऊनमध्येही बाहेर धावण्याचा सराव करत आहे. ज्यामुळे त्याला मैदानावर पुनरागमन करताना अधिक समस्या होणार नाही. इतर खेळाडू केवळ जिम ट्रेनिंग करत आहेत. त्यामुळे बीसीसीआयची अशी इच्छा आहे की, विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इतर अव्वल खेळाडूंनीही लवकरात लवकर आउटडोर ट्रेनिंग करावी.

शमीबद्दल बोलायचं झालं तर उत्तर प्रदेश येथील अमरोहा या गावात तो राहतो. येथे त्याचं भलं मोठं फार्महाऊस आहे आणि जागेची कसलीच कमतरता नाही. त्यामुळे त्याला धावण्याचा सराव करता येतोय. तर इतर खेळाडू मोठ-मोठ्या शहरात असूनही घरामध्ये बनवलेल्या जिममध्ये स्वत:ला फीट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

शमीने सराव करतानाचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. यामध्ये तो मोकळ्या पायाने रानात धावताना दिसत आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-वनडेत एकाच सामन्यात १७०पेक्षा जास्त चेंडू खेळणारे ५ खेळाडू

-३ लाजिरवाणे विक्रम, जे आहे भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर

-रोहितच्या आरोपांना शिखरने दिले गब्बर उत्तर, वाॅर्नरचीही केली बोलती बंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---