---Advertisement---

रोहित-विराटकडे इतिहास घडवण्याची संधी, टी-20 विश्वचषकात करावी लागणार ‘ही’ कामगिरी

On: रविवार, ऑक्टोबर 16, 2022 2:52 PM
Rohit Sharma And Virat Kohli
---Advertisement---

आगामी टी-20 विश्वचषक रविवारी 16 ऑक्टोबर रोजी सुरू झाला. पहिल्या सामन्यात नामिबियाने श्रीलंकेला तब्बल 55 धावांना पराभूत केले आणि स्पर्धेची सुरावत विजयाने केली. भारताला पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत खेळायचा आहे. मागच्या वर्षी यूएईत खेळलेल्या टी-20 विश्वचषकात भारताने अपेक्षित प्रदर्शन केले नव्हते, पण यावर्षी संघ चांगल्या प्रदर्शनाच्या प्रयत्नात असेल. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या प्रदर्शनावर भारतीय संघाचे प्रदर्शन बऱ्यापैकी अवलंबून असेल. या दोघांनी चर चांगली फलंदाजी केली, तर स्वतःच्या नावावर खास विक्रमाची नोंदही करू शकतात.  

विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यावर्षीच्या टी-20 विश्वचषकात चांगल्या फॉर्ममध्ये दिसले, तर ते या स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज बनू शकतात. रोहितने पहिला टी-20 विश्वचषक 2007 साली खेळला होता. त्यानेत आजपर्यंत टी-20 विश्वचषकात खेललेल्या 33 सामन्यांमध्ये रोहितने एकूण 347 धावा केल्या आहेत. विराट कोहली रोहितपेक्षा फक्त दोन धावा मागे आहे. विराटने पहिला टी-20 विश्वचषक 2012 मध्ये खेळला आणि तेव्हापासून आजपर्यंत खेळलेल्या या स्पर्धेत खेळलेल्या एकूण 21 सामन्यांमध्ये 845 धावा केल्या आहेत. टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत हे दोघे अनुक्रमे चार आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. पण यावर्षी चांगले प्रदर्शन करून ते पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतात.

टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाचा विक्रम सध्या श्रीलंकेचा माजी दिग्गज माहेला जयवर्धने (Mahela Jayawadene) याच्या नावावर आहे. जयवर्धानेने 2007 ते 2014 दरम्यानच्या पाच विश्वचषकांमध्ये 1016 धावा केल्या आहेत. जयवर्धने एकमेव खेळाडू आहे, ज्याने टी-20 विश्वचषकात 1000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर यूनिवर्सल बॉस म्हणजेच वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल () आहे. गेलने या स्पर्धेत एकूण 965 धावा केल्या आहेत. श्रीलंकेचा माजी दिग्गज तिलकरत्ने दिलशान यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिलशानने टी-20 विश्वचषकात एकूण 897 धावा केल्या आहेत. पहिल्या तिन क्रमांकांवर असलेले हे दिग्गज सद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर झाले आहेत. अशाच चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील रोहित आणि विराट त्याची जागा घेऊ शकतात. यासाठी त्यांना फक्त एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे यावर्षीच्या टी-20 विश्वचषकात संघासाठी वादळी खेळी.

टी-20 विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू (2022 पूर्वी)
1016 – माहेला जयवर्धने
965 – ख्रिस गेल
897 – तिलकरत्ने दिलशान
847 – रोहित शर्मा
845 – विराट कोहली
762 – डेविड वॉर्नर

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारत-पाक ‘क्रिकेटयुद्ध’ होणाऱ्या एमसीजीचा काय आहे इतिहास? कशी आहे आकडेवारी? वाचा सविस्तर
टी20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात नामिबियाचा कहर, श्रीलंकेला दिले 164 धावांचे टारगेट  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---