यंदाचे 2024 हे वर्ष संपणार आहे. हा वर्ष निवृत्तीचा राहिला असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण भारतीय खेळाडूंसह जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या वर्षी निवृत्तीची घोषणा केली. ज्यामध्ये नुकतेच टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनचा समावेश झाला आहे. कदाचित यंदाच्या वर्षी कोणत्यही क्रिकेटपटूची ही निवृत्ती (अश्विन) ची शेवटची असेल, अशी आशा करुयात. तर 2024 मध्ये एकूण 12 भारतीय खेळाडू निवृत्त झाले आहेत. ज्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांच्या नावांचाही समावेश आहे. या यादीत असे काही खेळाडू आहेत ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी संधी मिळाली नाही.
रोहित-कोहली आणि जडेजाने टी20 निवृत्ती घेतली
2024 टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी या फॉरमॅटला अलविदा केला. तथापि, हे तिन्ही खेळाडू इतर दोन फॉरमॅटमध्ये सक्रिय आहेत. म्हणजे एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट. इतर दोन फॉरमॅटमधील यापैकी काही खेळाडू पुढील वर्षी निवृत्ती जाहीर करू शकतात. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
धवन-कार्तिकनेही निरोप घेतला
क्रिकेटविश्वात गब्बर या नावाने प्रसिद्ध असलेले शिखर धवन आणि दिनेश कार्तिक यांनीही यावर्षी निवृत्ती जाहीर केली आहे. या दोघांनीही सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. धवन शेवटची कसोटी 2018 मध्ये, 2021 मध्ये टी20 आणि 2022 मध्ये वनडे सामना खेळला होता. तर कार्तिक शेवटची कसोटी 2018, वनडे 2019 आणि टी20 सामना 2022 मध्ये खेळला होता.
अश्विननेही टाटाला बाय बाय केले
गाबा कसोटीनंतर आर अश्विननेही सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 0-3 च्या पराभवाने अश्विन खूप दुखावला. प्लेइंग इलेव्हनच्या हमीशिवाय त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे नव्हते. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्याला स्थान मिळाले नाही, तेव्हा अश्विनला निवृत्तीची घोषणा करायची होती. परंतु रोहित शर्माने त्याला ॲडलेड कसोटीपर्यंत थांबवले जेथे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. तिसऱ्या कसोटीत त्याला पुन्हा वगळण्यात आले. तेव्हा त्याने निवृत्ती जाहीर केली. अश्विनने 2022 मध्ये शेवटचा टी20 आणि 2023 मध्ये एकदिवसीय सामना खेळला होता.
2024 मध्ये निवृत्त होणाऱ्या भारतीय खेळाडूंची यादी
सौरभ तिवारीने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
वरुण आरोनने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
दिनेश कार्तिकने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
केदार जाधवने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
विराट कोहलीने टी20 मधून निवृत्तीची घोषणा केली
रोहित शर्माने टी20 मधून निवृत्तीची घोषणा केली
रवींद्र जडेजाने टी20 मधून निवृत्तीची घोषणा केली
शिखर धवनने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
बरिंदर सरन यांनी सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
वृद्धीमान साहाने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
सिद्धार्थ कौलने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
आर अश्विनने सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली
हेही वाचा-
Team India Schedule; 2025 मध्येही क्रिकेटचा थरार रंगणार, या संघांसोबत सामने, पाहा वेळापत्रक
या देशांतर्गत संघाचे कर्णधारपद रिंकू सिंगकडे, आयपीएलमध्येही नशीब चमकणार?
दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूवर आयसीसीची कारवाई, एक चूक पडली महागात