भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. सोमवारी (३ जानेवारी) दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथे सुरू झाला. भारताचा नियमित कसोटी कर्णधार विराट कोहली (virat kohli) याने दुसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. दुखापतीमुळे विराट संघातून बाहेर झाल्यानंतर ट्वीटरवर चाहत्यांच्या वेगवेळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
दुखापतीमुळे विराटने हा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले आहे आणि त्याच्या जागी केएल राहुल (kl rahul) संघाचे नेतृत्व करत आहे. विराट कोहलीच्या जागी हनुमा विहारी (hanuma vihari) याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले.
दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या केएल राहुलने विराटच्या दुखापतीविषयी प्रतिक्रिया दिली. राहुल म्हणाला, “दुर्दैवाने विराटला दुखापतीची तक्रार आहे. फिजिओ त्याच्यावर काम करत आहेत आणि पुढच्या कसोटी सामन्यापर्यंत तो पूर्णपणे फिट होण्याची आशा आहे. प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की, त्याने स्वतःच्या देशाचे नेतृत्व करावे. मला मिळालेल्या या संधीसाठी खूप सन्मानित वाटत आहे. मी या आव्हानासाठी पूर्णपणे तयार आहे.”
भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू इरफान पठानने देखील विराट संघातून बाहेर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. इरफानच्या मते विराट कोहली फॉर्ममध्ये नसला, तरी दुसऱ्या कसोटी सामन्यातून तो बाहेर पडल्यामुळे दक्षिण अफ्रिका संघाला फायदा होणार आहे. चाहतांनाही विराटने सामन्यातून माघार घेतल्यानंतर वाईट वाटत आहे.
https://twitter.com/IrfanPathan/status/1477905870704967680?s=20
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विराट अनुपस्थितीत असल्यामुळे भारतीय संघाला नुकसान होण्याची शक्यता आहे. विराट मागच्या दीर्घ काळापासून मोठी खेळी करू शकला नसला, तरी संघाने त्याच्या नेतृत्वात अनेक महत्वाच्या मालिका जिंकल्या आहेत. चाहत्यांच्या मते दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटच्या आक्रमक नेतृत्वाची कमतरता भासेल, ट्वीटरवर अनेकजण विराटच्या अनुपस्थितीबाबत व्यक्त झाले आहेत.
पाहा चाहत्यांच्या ट्वीटरवरील प्रतिक्रिया –
https://twitter.com/adityaaadadhich/status/1477913726451732481?s=20
https://twitter.com/KabeerMoni/status/1477913606247251969?s=20
https://twitter.com/imAahmadlone/status/1477913579818872835?s=20
https://twitter.com/salunkhe8_ankit/status/1477913405746925570
https://twitter.com/Pjsingh075/status/1477913236015968256
https://twitter.com/PawanMa0022/status/1477913209247911938?s=20
महत्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेटर कोहली चक्क रस्त्यावर विकतोय मका? व्हायरल फोटो पाहून तुम्हीही पडाल गोंधळात
क्रिकेटचे चाणक्य…! ‘हे’ आहेत आशियातील सर्वात बुद्धिमान कर्णधार
व्हिडिओ पाहा –






