भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जितका चपळ व्यक्ती आहे तितकाच तो कठोर देखील आहे. कोहलीची हीच वृत्ती आहे जी त्याला लोकप्रिय बनवते आणि लोकांना त्याच्यावर टीका करण्यासही भाग पाडते. कोहली सध्या इंग्लंडमध्ये असून यजमानांविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. नॉटिंघम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तो शून्यावर बाद झाला आहे. यानंतर कोहलीने एका पत्रकाराच्या प्रश्नाला ज्या पद्धतीने उत्तर दिले आहे, ते सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याचा द्वंद्वी, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने त्याला शून्यावर बाद केले. जेव्हा पत्रकाराने पत्रकार परिषदेत कोहलीला याबद्दल प्रश्न विचारला; तेव्हा त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. कोहलीला विचारण्यात आले की, परदेशी दौऱ्यात त्यातही इंग्लंड दौऱ्यावर त्याच्याकडून जास्त अपेक्षा आहेत, त्यामुळे तो आपली कामगिरी सुधारण्यासाठी यावेळी काही अतिरिक्त करण्याचा प्रयत्न करेल का?
हा प्रश्न विचारताना पत्रकाराने बरेचसे स्पष्टीकरण दिले. कोहली त्या पत्रकाराचा लांबलचक प्रश्न आरामात ऐकत राहिला आणि मग त्याने डोळे मोठे केले आणि पूर्णपणे उदासीन चेहऱ्याने उत्तर दिले, ‘नाही’. त्यानंतर कोहलीने आणखी काही शब्द उच्चारलेही नाहीत. पत्रकाराच्या या प्रश्नावर त्याच्या डोळ्यांचे आणि चेहऱ्यावरचे भाव अतिशय रागीट दिसून येत होते. साहजिकच कोहली त्याच्या अभिव्यक्तीमध्ये फक्त एका शब्दाने बरेच काही बोलला. यावर पत्रकारही नि:शब्द झाला.
https://twitter.com/36__NotAllOut/status/1423286848902766600?s=20
कोहली आणि पत्रकारातील प्रश्न-उत्तराचा हा मजेशीर प्रसंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून कोहलीने पत्रकाराचा अपमान केला आहे, असे अनेकांना वाटते.
Reporter be like: pic.twitter.com/iXkbBElyjk
— 🐇 (@Hyppocriite) August 5, 2021
Memers to Virat bhai 😂 pic.twitter.com/fuPQ4685dL
— Timeinfinity00 (@Timeinfinity001) August 5, 2021
After that 'Nahi'
My mind : pic.twitter.com/OAjsIMCQu4— .. (@okkkkkkkiiuueue) August 5, 2021
https://twitter.com/dark_Nebula1/status/1423305098994671619?s=20
कोहलीने यावर स्पष्टपणे उत्तर दिले आहे की, तो ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळत आला आहे. त्याच पद्धतीने इंग्लंडमधील कसोटी मालिकेत देखील खेळणार आहे.
भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला नॉटिंघम कसोटीत १८३ धावांवर सर्ववाद करत चांगली सुरुवात केली. प्रत्युत्तरात केएल राहुलच्या ८४ धावा आणि रविंद्र जडेजाच्या तूफानी अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघ २७८ धावा करू शकला. यासह भारताने पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड संघाने २५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचे पुन्हा लोटांगण, बांगलादेशने जिंकला सलग तिसरा टी२० सामना; रिकॉर्ड बुकमध्ये मिळवली जागा
‘ट्विटर डर गया’! ब्लू टीक परत येताच फॉर्ममध्ये आले धोनीचे चाहते, कमेंट्सचा पाडला पाऊस
‘आम्ही मान्य करतो की पंत सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे,’ विरोधी संघाच्या अव्वल गोलंदाजाकडून स्तुती