पोचेफस्टरूम| दक्षिण आफ्रिकेत सुरु असेलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकाचा आज(9 फेब्रुवारी) अंतिम सामना 19 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 19 वर्षांखालील बांगलादेश संघात सेन्वेस पार्क स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल.
भारतीय संघ 19 वर्षांखालील विश्वचषकात 7 व्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. याआधी खेळेलेल्या 6 अंतिम सामन्यांपैकी 4 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून विजेतेपद जिंकले आहे. भारताने यापूर्वी 2000, 2008, 2012 आणि 2018 यावर्षी 19 वर्षांखालील विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे.
त्यामुळे विक्रमी 5 वे विश्वविजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली आज मैदानात उतरणाऱ्या युवा भारतीय संघाला विराट कोहली, सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
2008 च्या 19 वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या विराटने शुभेच्छा देताना ट्विट केले आहे की ‘विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी 19 वर्षांखालील भारतीय संघाला माझ्या शुभेच्छा. संपूर्ण देश तूमच्या पाठिशी आहे. विश्वचषक मायदेशात आणा.’
Sending my best wishes to the Indian U19 Cricket Team ahead of their World Cup final. The nation is behind you, bring it home boys. 🇮🇳 #U19CWC #IndianCricket @BCCI
— Virat Kohli (@imVkohli) February 9, 2020
त्याचबरोबर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विट केले आहे की ’19 वर्षांखालील भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा. आशा आहे की तूम्ही तूमची शानदार कामगिरी कायम ठेवाल आणि देशासाठी हा विश्वचषक जिंका.’
All the best to the U19 🇮🇳 Cricket Team for the U19 @cricketworldcup Final!
Hope you'll continue the stellar team performance & win this for India.#U19CWC #FutureStars #INDvBAN— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 9, 2020
वरिष्ठ भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ट्विट केले आहे की ’19 वर्षांखालील भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा.’
Wishing all the best to our Under-19 team for the final tomorrow. Go get it boys! 💪#U19CWC
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) February 8, 2020
याबरोबरच वरिष्ठ भारतीय संघाच्या चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान सहा, रहाणे या खेळाडूंनीही 19 वर्षांखालील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Wishes galore all the way from New Zealand for the U19 team ahead of the #U19CWC final. 🇮🇳🔥💪 #TeamIndia @cheteshwar1 @vijayshankar260 @Wriddhipops @ajinkyarahane88 pic.twitter.com/oCucTeOBzE
— BCCI (@BCCI) February 7, 2020
Goodluck to #TeamIndia for the U-19 @cricketworldcup #Final. Best wishes. Jai Hind 🇮🇳🙏 #iccu19worldcup
— Umesh Yaadav (@y_umesh) February 9, 2020
Wishing our U-19 Indian team all the luck for the @cricketworldcup final. Let's get the cup home boys 🇮🇳💪@BCCI #ICCU19WorldCup
— K L Rahul (@klrahul) February 9, 2020
भारत-बांगलादेश संघात आज होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक फायनलबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
वाचा👉https://t.co/PJqGKTFxVI👈#म #मराठी #Cricket #U19CWC #U19CWCFinal #INDvBAN— Maha Sports (@Maha_Sports) February 9, 2020
…म्हणून बीसीसीआयने ट्विट केले, 'जडेजाशी पंगा पडेल महागात'
वाचा- 👉https://t.co/eZcel3omDg👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ @imjadeja @BCCI— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020