---Advertisement---

गोलंदाजाला जोराने धडकला विराट, दोघेही धापकन कोसळले खाली; काळजाचा ठोका चुकवणारा Video

On: शुक्रवार, मे 20, 2022 4:59 PM
Virat-Kohli-Sai-Kishore-Collision
---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानात कधी, कोणती घटना घडेल? हे निश्चित नसते. असेच गुरुवारी (१९ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२२चा ६७वा साखळी फेरी सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरने ८ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यादरम्यान बेंगलोरचा फलंदाज विराट कोहली आणि गुजरातचा गोलंदाज साई किशोर यांची भर मैदानात एकमेकांना धडक झाली. 

बेंगलोरच्या (RCB vs GT) डावातील नवव्या षटकादरम्यान धाव घेण्यासाठी पळत असलेल्या विराटची (Virat Kohli) टक्कर गोलंदाज साई किशोरशी (Sai Kishore) झाल्यानंतर तो काही वेळ मैदानावर झोपून राहिला. विराटची ही अवस्था पाहून काही मिनिटांसाठी चाहत्याचा श्वास अटकला होता. 

कधी आणि कशी घडली ही घटना?
प्रथम फलंदाजी करताना गुजरातने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून विराट सलामीला फलंदाजीसाठी आला होता. या सामन्यात तो जुन्या रंगातही दिसला. याचदरम्यान गुजरातकडून साई किशोर नववे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या या षटकातील एका चेंडूवर विराटने जोरदार फटका मारला आणि तो धाव घेण्यासाठी पळाला. तिकडे सीमारेषेजवळ शुबमन गिलने चेंडू पकडला आणि वेगाने गोलंदाज साई किशोरकडे फेकला.

साई किशोर चेंडू पकडण्यासाठी नॉन स्ट्राईकरजवळ उभा होता. अशात विराट स्वत:ची विकेट वाचवण्यासाठी जोराने पळत आला आणि साई किशोरला (Virat Kohli Sai Kishore Collision) धडकला. या धडकेनंतर दोघेही मैदानावर कोसळले. विराटचे डोके जोराने साई किशोरला लागल्याने तो काहीवेळ अस्वस्थ झाला आणि मैदानावरच झोपून राहिला. हा प्रसंग पाहून अनेकांना वाटले की, विराटला गंभीर इजा झाली असावी. परंतु सुदैवाने तसे काही झाले नव्हते. विराट थोड्या वेळाने उठला आणि पुन्हा त्याच जोशाने फलंदाजी केली.

https://twitter.com/Jersey__Ten/status/1527335099976409096?s=20&t=RlVW5KvvvTVaACwu3OCssw

विराट या सामन्यात चांगल्या फॉर्मात दिसला. आयपीएल २०२२मध्ये धावा करण्यासाठी झगडताना दिसलेल्या विराटने या सामन्यात ७३ धावांची शानदार खेळी केली. ५४ चेंडू खेळताना २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने त्याने ही शानदार खेळी केली. त्याच्या या योगदानामुळे बेंगलोरचा संघ गुजरातला पराभूत करत प्लेऑफमधील आपले आव्हान कायम ठेवू शकला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

चौकार ठोकल्यानंतर विराटने केले पंड्याला स्लेज; तोंड लपवताना दिसला गुजरातचा कर्णधार

विराटची बटलरबरोबर अशी काय चर्चा झाली की, दोन्ही क्रिकेटर्सला अवरले नाही हसू, घ्या जाणून

मॅथ्यू वेडने ड्रेसिंग रूममध्ये केली तोडफोड, तर बीसीसीआयचा चढला पारा; लगावली फटकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---