भारताचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने त्यांची मैत्री जगजाहीर केली आहे. हे दोन्ही क्रिकेटपटू इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाकडून खेळतात. ज्याप्रकारे विराट आणि डिविलियर्स मिळून मैदानावर विरुद्ध संघाचा सामना करत असतात, त्याप्रमाणे दोघेही मिळून आता कोविड १९ या जागतिक महामारीविरुद्धच्या लढाईत उतरणार आहेत.
शुक्रवारी (२४ एप्रिल) विराट (Virat Kohli) आणि डिविलियर्सने (AB De Villiers) त्यांचे क्रिकेटचे सामान जसे की, बॅट, जर्सी, पॅड्स, ग्लोव्हज यांचा ऑनलाईन लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यात आयपीएल २०१६मध्ये दोघांनी गुजरात लायन्सविरुद्ध (Gujrat Lions) ज्या बॅटने शतक ठोकले होते, त्या बॅटचाही समावेश आहे. या लिलावातून जमा होणारी रक्कम ही कोरोना व्हायरसमुळे पीडित लोकांच्या मदतीसाठी वापरली जाणार आहे.
विराटने इंस्टाग्रामवर डिविलियर्सशी बोलताना सांगितले की, “आयपीएल (IPL) ट्रॉफी जिंकणे हे आताही माझे लक्ष्य आहे, परंतु काहीही झाले तरी मी माझा संघ सोडणार नाही.”
आरसीबी आतापर्यंत ३वेळा अंतिम सामन्यात पोहोचला आहे. मात्र त्यांना एकदाही विजय मिळवण्यात यश आले नाही. याविषयी बोलताना विराट पुढे म्हणाला, “हा शानदार प्रवास होता. सोबत राहून आयपीएल जिंकणे हे आमचे स्वप्न आहे. अशी कोणतीच परिस्थिती नाही ज्यामुळे मला माझा संघ सोडाण्याचा विचार करावा लागेल. एखादा हंगाम खराब गेल्यास आपण भावनिक होतो, पण जेव्हापर्यंत मी आयपीएल खेळेल तेव्हापर्यंत मी संघाला सोडणार नाही.”
विराटच्या आरसीबीबाबत असणाऱ्या भावना ऐकून डिविलियर्सने गेल्या ९ वर्षांपासून त्याला मिळालेल्या चाहत्यांच्या प्रेमाचा उल्लेख केला. तसेच डिविलियर्स म्हणाला की, “माझीही हीच स्थिती आहे. मला कधीच आरसीबीला सोडायचे नाही, पण यासाठी मला सतत धावा करत रहावे लागेल. कारण मी संघाचा कर्णधार नाही.”
शिवाय, विराट आणि डिविलियर्सने त्यांच्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संयुक्त वनडे संघाचीही निवड केली आहे.
या संघात त्यांनी आपल्याव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, जॅक कॅलिस, एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), युवराज सिंग, युजवेंद्र चहल, डेल स्टेन, जसप्रीत बुमराह आणि कागिसो रबाडा यांचा समावेश केला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमध्ये ८ वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व करणारा हा एकमेव खेळाडू
-आता एबी-विराट खेळणार कॅप्टन कूल धोनीच्या नेतृत्त्वाखाली
-केदार कधीच नाही खेळू शकत कसोटी, भज्जी- रोहितने सांगितले कारण