भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) टी20 विश्वचषकात शानदार फॉर्ममध्ये दिसून येतोय. भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. आता विराट खोऱ्याने धावा काढत असला तरी, अगदी काही दिवसांपूर्वी त्याचा फॉर्म खराब होता. मात्र, त्याने आता कामगिरीत सातत्य ठेवले आहे. आपल्या याच खरा फॉर्म दरम्यान आपल्याला माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा आत्मविश्वास देत होता असे विराटने कबूल केले आहे.
टी20 विश्वचषकात भारताच्या विजयाचा नायक ठरत असलेल्या विराटने आपला आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या पॉडकास्टमध्ये आपल्या खराब फॉर्म वेळीच्या दिवसांबाबत खुलासा केला. विराट म्हणाला,
“मी कबूल करू इच्छितो की त्या दिवसांमध्ये ज्या व्यक्तीने माझा सर्वाधिक विश्वास वाढवला, माझ्याशी सातत्याने संपर्क ठेवला ती व्यक्ती एमएस धोनी होती. माझ्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे की, एका अशा व्यक्तीशी माझे इतके ऋणानुबंध आहेत, जो माझ्यापेक्षा खूप वरिष्ठ आहे.”
धोनीने कशा प्रकारचा संदेश दिला याबाबत बोलताना विराट म्हणाला,
“त्याने मला पाठवलेल्या संदेशात लिहिले, लोक तुमच्याकडून अशी अपेक्षा करतात की, तुम्ही मजबूत व्हायला हवे, तुमच्याकडून चांगली कामगिरी व्हायला हवी. मात्र, तुमची स्थिती कशी आहे हे लोकांना माहीत नसते.”
विराटने दोन महिन्यांपूर्वी झालेल्या आशिया चषकातून आपल्या शतकांचा दुष्काळ संपवला होता. अफगाणिस्तानविरूद्ध त्याने आपले पहिले टी20 व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71 वे शतक पूर्ण केले. त्यानंतर आता विश्वचषकात तो अविश्वसनीय कामगिरी करतोय. विश्वचषकाच्या पाच सामन्यात त्याने 3 अर्धशतकासह 226 धावा केल्या आहेत. तसेच, ऑक्टोबर महिन्याचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार (ICC Player Of The Month) त्याला प्रदान करण्यात आला आहे. (Virat Kohli Said Only MS Dhoni Text Me In My Bad Form)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिकी पॉंटिंगची भविष्यवाणी! म्हणाला ‘हा’ बनू शकतो ऑस्ट्रेलियाचा पुढचा कर्णधार
टी20 विश्वचषकाच्या धामधुमीत किंग कोहली ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’, महिलांमध्ये ‘ही’ ठरली विजेती