Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रॅपर एमसी स्क्वेअरचे विराट कोहलीकडून कौतुक, म्हणाला, ‘हे गाणे कमीत कमी 100 वेळा ऐकले’

रॅपर एमसी स्क्वेअरचे विराट कोहलीकडून कौतुक, म्हणाला, 'हे गाणे कमीत कमी 100 वेळा ऐकले'

November 7, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
mc square virat kohli

Photo Courtesy: Instagram/Virat Kohli/MC SQUARE/LAMBARDAR


भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या संघासोबत ऑस्ट्रेलिमध्ये आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये असून उपांत्य फेरीत पोहोचला आहे. विराट कोहली देखील विश्वचषक स्पर्धेदरम्यान जबरदस्त प्रदर्शन करत आहे. विराट कोहली संगिताचा मोठा चाहता असून तो सर्व प्राकारचे गाणे ऐकत असतो. त्याने आता एका भारतीय टीव्ही शो मधील रॅपर एमसी स्क्वेअर म्हणजेच अभिषेक बन्सल याचे कौतुक केले आहे. 

अभिषेक बन्सल याला सर्वजन एमसी स्क्वेअर (MC Square) नावाने ओळखतात. स्वतः विराट कोहली (Virat Kohli) देखील त्याचा चाहता असल्याचे समोर येत आहे. विराटने अभिषेकचे गाणे नैनो की तलावर विशेष आवडते. अभिषेकचे कौतुक करण्यासाठी विराटने त्याला स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून मेसेज केल्याचे समोर येत आहे. अभिषेकने नुकतेच एमटीव्ही हसल (MTC Hustle) या कार्यक्रमाचे विजेतेपद जिंकले. अभिषेकने विराट कोहलीसोबत झालेली चर्चा सर्वाेसोबत शेअर केली आहे. भारतीय संघाच्या या माजी कर्णधासोबत बोलून आयुष्यात काहीतरी मोठे केल्यासारखे वाटले, असेही तो म्हणाला.

विराट कोहलीचे संगीतप्रेम वेळोवेळी चाहत्यांना दिसून आले आहे. त्याने अनेकदा संगीतकारांचे कौतुक देखील केले आहे. एमसी स्क्वेअर म्हणजेच अभिषेकसोबत देखील त्याने असेच काहीतरी केल्याचे दिसते. अभिषेकचे कौतुक करण्यासाठी विराटने त्याला इंस्टाग्रामवर पर्सनल मेसेज केला. विराटने लिहिले की, “भाई तू तर कमाल केलीस, वाह.” विराटचा हा संदेश पाहून नक्कीच अभिषेकला आनंदाजा धक्का बसला असवा. त्याने प्रत्युत्तर देत लिहिले की, “धन्यवाद भैया, मी पहिल्या दिवसापासून तुझा मोठा चाहता आहे. आजचा दिवस सार्थकी लावलास तू.”

विराटने त्याला पुढच्या मेसेजमध्ये लिहिले की, “आनंदी राहा, मेहनत घेत राहा. नैना की तलवार मी कमीत कमी 100 पेक्षा जास्त वेळा ऐकले आहे.” विराटचे हे शब्द वाचूल्यानंतर अभिषेकने लिहिले, “तुझे खूप धन्यवाद भैया. मी या गोष्टीमुळे खूप आनंदी आहे.” दरम्यान, विराट अभिषेकचे फक्त कौतुक करून धांबला नाही. त्याने अभिषेकला सोशल मीडियावर फॉलो देखील केले आहे. अभिषेकने स्वतः या सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याने एमटीव्ही हसल या कार्यक्रमादरम्यान चाहते आणि प्ररिक्षकांची मने जिंकत विजेतेपद पटकावले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी आनंदाची बातमी, इंग्लंडचा ‘हा’ स्फोटक खेळाडू मुकणार सेमीफायनलला!
रिकी पॉंटिंगची भविष्यवाणी! म्हणाला ‘हा’ बनू शकतो ऑस्ट्रेलियाचा पुढचा कर्णधार 


Next Post
Virat Kohli Bowling

वाईट काळात केवळ 'या' व्यक्तीने वाढवला विराटचा आत्मविश्वास; स्वतः केला खुलासा

India & Kumar Dharmasena

आता पराभव निश्चित! इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनलसाठी कुमार धर्मसेनाचे नाव पाहून भारतीय चाहत्यांना फुटला घाम

Suryakumar-Yadav

"अरे तो सूर्या परग्रहावरून आलाय"; पाकिस्तानी दिग्गजाने केले तोंडभरून कौतुक

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143