लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२२च्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) १४ धावांनी विजय मिळवला. यासब आरसीबीने त्यांचे क्वालिफायर २ चे तिकीट पक्के केले आहे. आरसीबीच्या या विजयाचा शिल्पकार राहिला, रजत पाटीदार. पाटीदारने आपल्या तोबडतोब शतकी खेळीच्या जोरावर आरसीबीला महत्त्वपूर्ण सामना जिंकून दिला. यानंतर आरसीबीचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने पाटीदारविषयी मोठे भाष्य केले आहे.
एलिमिनेटर सामन्यानंतर (Eliminator Match) विराटने (Virat Kohli) पाटीदारची मुलाखत घेतली, ज्याचा व्हिडिओ आयपीएलच्या वेबसाईटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ विराट म्हणाला (Virat Kohli Praised Rajat Patidar) की, “मी गेल्या कित्येक वर्षात बऱ्याच प्रभावशाली आणि दवाबात खेळल्या गेलेल्या खेळी पाहिल्या आहेत. परंतु पाटीदारसारखी खेळी फार कमी पाहिली आहे. दबावाखाली एका मोठ्या सामन्यात कोणत्या अनकॅप्ड खेळाडूने खेळलेली ही पहिलीच खेळी आहे.”
“हा खूप महत्त्वपूर्ण सामना होता. अगदी मीसुद्धा खूप तणावात होतो. कारण मी त्या परिस्थितीत राहिलो आहे, जिथे तुम्हाला एक संघ म्हणून सीमा पार करावी लागते. पाटिदारने जे काही केले, ते खूप खास होते. असे वाटत आहे की, याला हलक्यात नाही घेतले पाहिजे,” असे विराटने पुढे म्हटले.
याबरोबरच विराटने पाटीदारवर कौतुकाची थाप मारत त्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दलही विधान केले आहे. “रजत पाटीदार (Rajat Patidar) हे ते नाव आहे, जे तुम्हाला भविष्यात खूप वेळा ऐकायला मिळेल,” असे विराटने म्हटले आहे.
💬 💬 "Haven't seen many better innings than the one Rajat played."
DO NOT MISS: @imVkohli chats with the man of the moment, Rajat Patidar, after @RCBTweets' win over #LSG in Eliminator. 👏 👏 – By @RajalArora
Full interview 📹 🔽 #TATAIPL | #LSGvRCBhttps://t.co/ofEtg6I3Ud pic.twitter.com/TG8weOuZUo
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2022
पाटीदारने या सामन्यात ५४ चेंडूत नाबाद ११२ धावा (Rajat Patidar Century) फटकावल्या. २०७.४१च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या. तसेच या खेळीदरम्यान त्याने ७ षटकार आणि १२ चौकारही मारले. अशाप्रकारे पाटीदारने केवळ षटकार-चौकारांच्या मदतीनेच ९० धावा कुटल्या. या झंझावाती खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊ गौरवण्यात आले.
यासह आयपीएल २०२२मधील सर्वात वेगवान शतक आता पाटीदारच्या नावावर झाले आहे. अवघ्या ४९ चेंडूत त्याने शतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासात सर्वात मोठी खेळी करणाऱ्यांच्या यादीत देखील रजत पाटीदार (Rajat Patidat) नव्याने सहभागी झाला आहे. प्लेऑफच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग आहे, ज्याने १२२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर नाबाद ११७ धावांसह शेन वॉटसन आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या झगमगाटात नवी कसोटी क्रमवारी जाहीर; रोहित-विराट-बुमराहला…
क्या मस्त खेला रे तू! विराटच्या नेत्रदिपक चौकाराचं गांगुली, जय शहाकडून कौतुक, रिऍक्शन कॅमेरात कैद
Video: खुद्द कर्णधारानेच केली निराशा! राहुलने झेल सोडताच जल्लोष करत असलेल्या गंभीरने धरलं डोक