---Advertisement---

“स्मिथ आमच्या पिढीतील सर्वोत्तम फलंदाज”, विराटने दिली मोठ्या मनाने कबुली

On: गुरूवार, जून 8, 2023 8:53 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 च्या अंतिम सामन्यातील पहिल्याच दिवशी भारताविरुद्ध दमदार फलंदाजी केली. बुधवारपासून (दि. 07 जून) खेळल्या जात असलेल्या या सामन्यासाठी दोन्ही संघ इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर आमने-सामने आहेत. तत्पूर्वी, भारतीय संघाचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज विराट कोहली याने आयसीसीला मुलाखत दिली. यामध्ये बोलताना त्याने ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ याचे तोंडभरून कौतुक केले.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी विराटने प्रसारण वाहिनीला एक मुलाखत दिली. यामध्ये बोलताना त्याने ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार व दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ याचे मनापासून कौतुक केले. विराट म्हणाला,

“स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये जो प्रभाव पाडला, तो गेल्या दशकभरात कोणीही पाडलेला मी पाहिलेला नाही. त्याचे सातत्य आणि त्याने केलेल्या धावा असाधारण आहेत. स्मिथ हा आमच्या पिढीतील कसोटीतील सर्वोत्तम फलंदाज आहे. गेल्या 10 वर्षात मी 60+ सरासरीने कोणालाही धावा करताना पाहिलेले नाही.”

क्रिकेटजगतात सातत्याने विराट कोहली व स्मिथ यांची तुलना केली जाते. दोघांच्या नावे अनेक विक्रम जमा असून, आपापल्या देशासाठी त्यांनी नेहमी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. काही लोक स्मिथला कसोटीतील सर्वोत्तम फलंदाज मानतात. तर, विराट हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे बोलले जाते.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्या विषयी बोलायचे झाल्यास, स्मिथने या ठिकाणी देखील आपली छाप सोडली आहे. ट्रेविस हेडसह 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करत त्याने आपल्या संघाला पहिल्या दिवशी मजबूत स्थितीत पोहोचवले. पहिल्या दिवशी तो नाबाद 95 धावा काढून मैदानावर उभा आहे.

(Virat Kohli Said Steve Smith Is Best Test Batter In Our Generation)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---