भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून (१२ मार्च) टी -२० मालिकेला प्रारंभ होत आहे. हे सामने नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. ५ सामन्यांच्या मालिकेसाठी फेब्रुवारीतच भारतीय टी२० संघाची घोषणा करण्यात आली होती. या संघात आयपीएल २०२० मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, फिरकी गोलंदाज वरून चक्रवर्तीला संधी देण्यात आली होती. परंतु फिटनेस टेस्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले आहे. याबाबत कर्णधार विराट कोहलीने संताप व्यक्त केला आहे.
‘मिस्ट्री स्पिनर’ वरून चक्रवर्तीला आयपीएल २०२० मध्ये केलेल्या प्रदर्शनानंतर संधी मिळाली होती. परंतु त्याला फिटनेस टेस्ट पूर्ण करण्यात एकदा नव्हे तर दोनदा अपयश आले असल्यामुळे तो संघाबाहेर झाला आहे.
याबाबत विराट कोहली म्हणाला, “खेळाडूंना भारतीय संघासाठी बनवल्या गेलेल्या पद्धती समजून घेण्याची आवश्यकता आहे. आम्हाला फिटनेसच्या सर्वोच्च स्तरावर काम करत आहोत. आम्ही आशा करतो की, खेळाडूंना या गोष्टीचे पालन करावेच लागेल. या गोष्टीसोबत आम्ही कुठलीही तडजोड नाही करू शकत.”
दुसऱ्यांदा गमावली भारतीय संघात खेळण्याची संधी
वरून चक्रवर्ती याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी देखील संघात स्थान देण्यात आले होते. परंतु त्याच्या खांद्यामध्ये दुखापत झाल्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर दुखापतीतून बाहेर आल्यानंतर त्याला फिटनेससाठी एनसीएमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु त्याला यो-यो टेस्ट आणि २ किलोमीटर धावण्याच्या नव्या फिटनेस टेस्टमध्ये अपयश आल्यामुळे त्याला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापासून मुकावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“तो माझ्यासाठी सर्वात वाईट दिवस होता, मी अक्षरश: खोलीत एकटाच ढसाढसा रडलो”
“पोलार्डने नंतर माझ्याशी क्षमा मागितली आणि..,” ‘त्या’ विवादास्पद घटनेबद्दल श्रीलंकन फलंदाजाचा खुलासा
सूर्यकुमार यादवला बुमराह-संजनाच्या नात्याची पूर्वकल्पना होती? ‘ते’ ट्विट करत आहे इशारा