---Advertisement---

“मला एमएसकडून ही अपेक्षा नव्हती”, विराटने केला धोनीबद्दल नवा खुलासा

MS-Dhoni-And-Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि वरिष्ठ फलंदाज विराट कोहली यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण क्रिकेट जगतासाठी कौतुकाचा विषय आहे. विराट सातत्याने धोनीने आपल्याला कशा प्रकारे मदत केली हे सांगताना दिसतो. आता त्याने धोनीबाबत एक नवा खुलासा केला आहे.

विराट कोहली मागील काही काळापूर्वी अत्यंत खराब फॉर्ममधून जात होता. तब्बल तीन वर्ष तो आंतरराष्ट्रीय शतक झळकावू शकला नव्हता. या काळात त्याच्यावर अनेकांनी टीका केली होती. तसेच, त्याला संघातून बाहेर काढण्याची देखील मागणी अनेक जण करत होते. या कठीण काळात धोनीने आपल्याला अनेकदा सावरल्याचे विराटने काही दिवसांपूर्वीच कबूल केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याने आपल्यावर धोनीच्या नात्याविषयी एक नवा खुलासा केला.

नुकतेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून एक पॉडकास्ट रिलीज करण्यात आले. यामध्ये बोलताना विराटने धोनीने आपल्याला कशाप्रकारे मदत केली याचा किस्सा सांगितला. तो म्हणाला,

“मी ज्यावेळी कठीण काळातून जात होतो त्यावेळी मला धोनीचा दोन वेळा फोन आला. ही खरंतर अनपेक्षित गोष्ट होती. कारण, धोनी 99 % कोणाचा फोन उचलत नाही. मात्र तो स्वतःहून दोन वेळा कॉल करतो ही आनंदाची गोष्ट आहे. त्याने मला चांगले समजावले. वयाच्या 23 व्या वर्षी त्याने मला उपकर्णधार बनवले होते. त्यामुळे आमच्या दोघातील बॉंड चांगला बनला.”

विराट कोहली आणि एमएस धोनी (Virat Kohli  And MS Dhoni) यांनी 2008 ते 2019दरम्यान एकूण 285 सामने एकत्र खेळले आहेत. त्यात 30 कसोटी, 195 वनडे आणि 60 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांचा समावेश आहे.

(Virat Kohli Said Virat Kohli Call Me Twice In My Bad Patch)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेन वॉर्नचा कसोटी रेकॉर्ड तोडण्यासाठी अँडरसन सज्ज! हव्या आहेत फक्त ‘एवढ्या’ विकेट्स
‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने अजिंक्य रहाणेला मागितली मदत, फलंदाजी पाहून झालेला हैराण 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---